Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २०, २०१७

कारच्या धडकेत मोटारसायकल स्वार ठार

बाजारगाव:गजेंद्र डोंगरे

राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वरील धामना परिसरात कार व मोटारसायकल मध्ये धडक झाल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला तर एक जखमी झाला.
           प्राप्त माहितीनुसार मृतक गजानन रामराव कळसकर वय 50 रा एमआयडीसी हिंगणा हे मोटारसायकल क्र एम एच 40 व्ही 5609ने मुलगा
सागर गजानन कळसकर वय 23 यांस सोबत घेऊन वाडी कडून धामना परिसरात रस्तादुभाजकडून वळण घेत असताना बुलढाणा वरून नागपूर कडे जाणाऱ्या कार क्र एम एच 28व्ही 2826 ने भरधाव वेगाने येऊन मोटारसायकल ला धडक दिल्याने मृतक गजानन 15 फूट फरफडत जाऊन जागीच ठार झाला तर सागर गंभीर जखमी झाला.कारमधील डॉ प्रशांत अर्जुन पाटील व कार चालक किरकोळ जखमी असून वाडीतील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.पुढील तपास हिंगणा पोलीस करीत आहे.






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.