Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर २३, २०१७

चौकसे कुटुंबियातील दोन ठार


  • अकोला-अमरावती महामार्गावर
  • टँकरने कारला चिरडले ;
  • कन्हान येथील तीन जखमी

पारशिवणी/ तालुका प्रतिनिधी :
कन्हान वरून सह कुटुंब गजानन महाराजांच्या दर्शनाला जात असलेल्या कन्हान तारसा चौक इंदिरा नगर येथील चौकसे कुटुंबियांवर अमरावती महामार्गावर काळाने आघात केला कन्हान वरून शेगाव ला जात असताना कारला विरुद्ध दिशेने येत असलेल्या पेट्रोलच्या टँकरने जबर धडक दिली ज्यात कार मधील चौकसे कुटुंबियांपैकी मृतक मनोज भीखुलाल चौकसे वय ४४ व त्यांचा पुतण्या तन्मय अनिल चौकसे वय १३ वर्षे दोघेही जागीच ठार झाले तर तीन गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.कुमारी परी मनोज चौकसे वय ३ वर्षे,वेदी मनोज चौकसे वय १० वर्षे या मुली व पत्नी रीना मनोज चौकसे ३३ वर्षे या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.

चौकसे कुटुंबीय बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे जाण्यास सकाळी ९ वाजताच्या सुमारास कन्हान तारसा चौक इंदिरा नगर येथून सह कुटुंब एम.एच.४० ए.१७६८ या क्रमांकाच्या अल्टो गाडीने शेगाव कडे रवाना झालेले होते.अमरावती महामार्गावर बोरगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या नवीन बायपास जवळ दुपारी १२.३० च्या सुमारास विरुद्ध दिशेने येणार्या पेट्रोलच्या टँकर क्रमांक एम.एच.२९ टी.६५१ ने चौकसे कुटुंबियाच्या कार ला जोरदार धडक दिली.धडक इतकी जबर झाली की कारचा घटना स्थळावरच चुराळा झाला.अपघातात कार चालक मृतक मनोज उर्फ प्रवीण भीखुलाल चौकसे वय ४४ व त्यांचा पुतण्या तन्मय अनिल चौकसे वय १३ वर्षे दोघेही राहणार इंदिरा नगर कन्हान येथील असून तारसा चौक येथे मनोज यांची,चौकसे मेडिकल स्टोर होते.सोबतच कन्हान येथील बळीराम दखने हायस्कुल शिक्षक म्हणून मनोज चौकसे कर्तव्यावर होते.अपघातात मृतक मनोज यांची मुलगी कुमारी परी मनोज चौकसे वय ३ वर्षे व पत्नी रीना मनोज चौकसे ३३ वर्षे या दोघांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी  प्रकृती नाजूक असल्याचे सांगितल्या जात आहे.तर मुलगी कुमारी वेदी मनोज चौकसे वय १० वर्षे हिला कीरकोळ जखमा झाल्यात.घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना उपचारासाठी अकोला येथे एका खासगी इस्पितळात उपचार सुरु करण्यात आले तर मृतकांना सर्वोपचार रुग्णालयात ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळालेली आहे.

# सोशल मीडियावर दिली सर्व प्रथम माहिती...
अपघाता च्या काही वेळातच अपघात स्थळा वरील मृतकांच्या फोटो व लायसन्स ने सोशल मीडियावर धडक देत कन्हान शहरा सकट चौकसे कुटुंबियांचे मन हेलावून टाकले सोशल मीडिया व्हाट्स अँपवर मृतकाच्या खिशातून पोलिसांना लायसेन्स मिळाले होते.ज्यात प्रवीण भीखुलाल चौकसे जिल्हा नागपूर,तह पारशिवणी कन्हान रायनगर नगर असे नमूद होते.ज्या नंतर सोशल मीडियावरून अपघाताच्या फोटो व लायसेन्स च्या आधारावर कन्हान मध्ये चौकसे कुटुंबियांच्या अपघाताची बातमी येऊन धडकली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.