Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर ०८, २०१७

मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कटेझरी पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर वनजमीन वळती

Sudhir Mungantiwar


गडचिरोली/प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटझेरी  येथे पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टरची संरक्षित वनजमीन वळती करण्यास मान्यता देण्यात  आली असून  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने  कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या पोलीस मदत केंद्रामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच अवैध वृक्षतोड रोखण्यास मदत होणार आहे. पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने सार्वजनिक हिताच्यादृष्टीने  उपयुक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५ हेक्टरपर्यंतची वन जमीन वळती करण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार राज्य शासनाला सुपुर्त केले आहेत.  या अधिकाराचा वापर करून वनमंत्री म्हणून यासंबंधीच्या अटी आणि शर्तींचे पालन करत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गडचिरोली हा केंद्र शासनाने देशातील ६० नक्षलग्रस्त प्रभावित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केलेला जिल्हा आहे. वळती करण्यात आलेली वनजमीन  ही या नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याने त्यास मान्यता देण्यात आली आहे 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.