Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

कापसाच्या ढिगाऱ्यात आढळला त्या २७ दिवसीय चिमुकलीचा मृतदेह

चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
चंद्रपूर:(ललित लांजेवार)
आजच्या २१ व्या शतकात सुद्धा जेव्हा मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत असतांनाही मुली या ओझं वाटत असण्यारी सडकी मानसिकता अजूनही जिवंत असल्याचे ताजे उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे बघायला मिळाले. जिवती तालुक्यातील सोमलगुडा या गावातील एका विकृत मानसिकतेच्या आजीने वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या हव्यासापोटी चोरीछुपे एका सत्तावीस दिवसांच्या नातनीचा गळा घोटून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुनेच्या पोटी तिसरीहि मुलगीच झाल्याने नाराज आजीने सत्तावीस दिवसाच्या आपल्या नातनीलाच गळा घोटून संपवलं,  ५ नोव्हेंबर ला दुपारच्या सुमारास पाळण्यात घातलेली सत्तावीस दिवसाच्या चुमुकली अचानक घरातून गायब झाली,घरातल्या मंडळींनी शोधाशोध केली, कोणी तिचा गोडवा करायला तर नेलं नाही न ?अश्या आशयातून तिचा शोध सुरु होता. मात्र सर्व प्रयत्न करूनही  आपली मुलगी कुठेच मिळत नाही त्यामुळे आता शेवटचा पर्याय घरच्यांच्या समोर पोलीस स्टेशन उरला होता.त्या चिमुकलीच्या घरच्यांनी पोलिसात धाव घेत ५  नोव्हेंबरला मुलगी पाळण्यातून हरविल्याची तक्रार मुलीचे वडील रावसाहेब राठोड यांनी जिवती पोलीस स्टेशन येथे केली.त्या अनुशंघाने जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार आर.बी. नाईकवाड यांनी पोलीस अधीक्षक नियती ठाकर व अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. 
पोलिसांनी देखील तात्काळ तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला.शेतात,गावात अश्या आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण शोध पोलीस घेत होती.प्रत्येकाची विचारपूस करत होती , तपास सुरू असतांना हे निरागस बाळ कुठेच दिसून येत नव्हतं,यावर पोलिसांना शंका आली आणि त्यांनी तपासाची चक्रे कुटुंबाकडे फिरवली,दोन सरकारी पंचान समक्ष आता कुटुंबाची चौकशी सुरु झाली होती,पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर आता फक्त फिर्यादीच्या घराची झडती घेणे बाकी राहिले होते,त्यामुळे पोलिसांनी फिर्यादीच्याच घराची झडती घेणे सुरु केले,सध्या कापसाचा हंगाम सुरु आहे शेतकरी कापूस वेचून आपल्या घरात हा भरून ठेवतात अशीच एक खोली आरोपीच्या यांच्या घरी संपूर्ण कापसाने भरली होती ,पोलिसांच्या संशयाच्या घेऱ्यात असलेला कुटुंबाच्या घरातील या खोलीचा दार उघडला आणि संपूर्ण कापसाने भरलेल्या या खोलीतील कापूस खाली करण्याचे ठरविले ,हा कापूस खाली करत असतांना त्या २७ दिवसीय चिमुकलीचा मृतदेह त्या कापसाच्या ढिगाऱ्याखाली मिळून आला,आणि तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

आता जेव्हा मृतदेह घरी आहे म्हणजे घरच्याच व्यक्तीने खून केला असावा असे व या सह अनेक प्रश्न  पोलिसानं समोर आरोपीला पकडण्यासाठी उभे ठागले होते,पोलिसांना चौकशी करतांना घरच्या प्रत्येकाची चौकशी केली त्यात आरोपी आजीकडून मिळणाऱ्या उत्तरात पोलिसांना शंका बळावली   त्यावरून आरोपी जनाबाई नारायण राठोड हिची  पोलिसांनी कसून चौकशी केली त्यावरून त्या चिमुकलीचा खून तिच्याच आजीने केला असे निष्पन्न झाले, प्रकरणात आरोपी  जनाबाई नारायण राठोड (वय 60) हिला पोलिसांनी अटक करून कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

आजी हि मुलगी झाली तेव्हा पासून नाराज होती. मात्र या आजीच्या मनात आतल्या आत  काय शिजत होते हे कोणालाच ठाऊक नव्हते,जिचे डोळेही नीट उमलले नव्हते अश्या तान्हुलीच्या जन्मानंतर निव्वळ सत्तावीस दिवसांनंतर तिच्याच आजीनी तिचा खून केला.असे निष्पन्न झाले .

२०१५ मध्ये एक हजार मुलांमागे ९०७ मुलींचे प्रमाण होते. २०१६ मध्ये त्यात आणखी घसरण झाल्याने हा चिंतेचा विषय बनला.  राज्याच्या आरोग्य विभागाने एप्रिल २०१७ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यात मुलींचा जन्मदर घटला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती ,राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात मुलींचा जन्मदर कमी झाला आहे. मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी शासन वेगवेगळया माध्यमातून जनजागृती करीत असते. समाजात जनजागृती करणे आणि मुलींच्या जन्मदरात वाढ करणे यासाठी शासन मुलींसाठी मोफत शिक्षण, वेगवेगळ्या शिष्यवृत्ती, सारख्या योजना राबविते आणि समाजाला मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी प्रात्साहीत करते.

नुकताच हरियाणा सरकारने मुलींच्या लिंग गुणोत्तरात वाढ होण्यासाठी अश्याच प्रकारे एक आशादायी पाऊल उचलले आहे. तिसरी मुलगी ज्या कुटुंबात जन्माला येईल त्या कुटुंबाला २१ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. ज्यांचा जन्म ऑगस्ट २०१५ नंतर झाला आहे, अशा सर्व कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, मुलींचा मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या विविध तपासण्या मोफत करणे, पूरक व पोषक आहार देणे, प्रसूती खर्च म्हणून रोख अनुदान देणे यासारखे पूरक कार्यक्रम राबविले जात आहे. त्याचबरोबर बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमांतर्गत मोफत शिक्षण, कन्यदान योजना यासारखे कार्यक्रम हाती घेऊन शासनस्तरावर व्यापक जनजागृती सुरू आहे.

इतके सगळे करूनही हि घडलेली विकृत मानसिकता बदलविण्यासाठी या संपूर्ण प्रकरणावरून  महाराष्ट्र सरकारला मुलींच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यासाठी जनगागृतीची आवश्यकता भासणार असल्याचे चित्र दिसत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा सरासरी जन्मदर कमीच आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनस्तरावर  सुरू असलेल्या प्रयत्नास आता सामाजिक संघटनांनीही पाठबळ देण्याची गरज आज या निमित्याने निर्माण होत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.