
पारशिवणी - तालुक्यातील ग्राम पंचायत जुनी कामठी-गाडेघाट येथे ९ सदस्यीय व १ सरपंच अश्या १० सदस्यांन साठी निवडणूक घेण्यात आली होती.यात भाजप च्या सरपंचासह ६ सदस्य भाजपने जिंकून आणून आपला कमळ फुलविलेला होता.उपसरपंच पदाचे निवडणूक दि.२३ नोव्हे ला ग्राम पंचायत कार्यालय जुनीकामठी येथे संपन्न झाली ज्यात जुनीकामठी ग्राम पंचायत वर भाजप पक्षाचे भूषण वामन इंगोले यांनी स्वतःच्या मता सह ६ मते घेऊन एकतरफा विजय मिळविला. सरपंच व उपसरपंच निवडी मुळे भाजप पक्षाच्या हातात बहुमताने जुनीकामठी ग्राम पंचायत ची सत्ता आली.जुनीकामठी ग्राम पंचायत मध्ये भाजप कडून भूषण इंगोले आणि काँग्रेस मधून अनिल वयले यांनी उपसरपंच पदा करिता आपले नामांकने निवडणूक अध्यासीन अधिकारी नवनिर्वाचित सरपंच मोहन खंडारे आणि ग्रा.प. सचिव आतिष देशभ्रतार यांच्या सुपूर्द करण्यात आलेली होती. ज्या नंतर लगेच ९ सदस्यांन कडून उपसरपंच पदाच्या उमेदवारी साठी मतदान प्रक्रियेला सुरवात झाली.भाजपच्या भूषण इंगोले यांच्या समक्ष कुठल्याही प्रकारचे मोठे आव्हान काँग्रेस च्या प्रतिद्वंदी उमेदवार अनिल वयले यांच्या कडून नव्हते कारण भाजप पक्षाकडून सरपंच पदा सह ६ सदस्य जिंकून आणत पक्षाने आधीच आपल्या उपसरपंच पदाची वाट मोकळी केलेली होती.मतमोजणी ला सुरवात होताच अनिल वयले यांना काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची ३ मते तर भूषण इंगोले यांना भाजपची स्वतःच्या मता सह ६ मते गेलीत ज्यामुळे एकतर्फी विजय जुनीकामठी ग्राम पंचायत च्या उपसरपंच पदावर इंगोले यांनी मिळवीला.भाजप पक्षा कडून अभिर गुलाल उडवत समर्थकांची तोंड गोड करून आनंदाचा उत्सव भाजप पक्षा कडून साजरा करण्यात आला.मतदान प्रक्रियेत मध्ये सुषमा खंते,राहुल ढोके, माया मडावी,विद्या बावणे, सुजाता कावळे,भूषण इंगोले,निलेश वयले, विनायक खंडाते,सोनटक्के या नवनिर्वाचित सदस्यांनी सहभाग घेतला.