Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर १४, २०१७

गटशिक्षणाधिकाऱ्यांची तंबाखू मुक्त शाळा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर प्रतिनिधी :
सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई व जि. प. शिक्षण विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़ .
  सदर कार्यशाळा दि. 15नोव्हेंबर 2017 रोजी स्व.  दादासाहेब कन्नमवार सभागूह जि. प चंद्रपूर येथे संपन्न होत आहे़. या कार्यशाळेत जिल्ह्यातील समस्त गटशिक्षणाधिकारी व प्रत्येक तालुक्यातील  दोन  मुख्याध्यापक यांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  या कार्यशाळेत प्रशिक्षीत व्यक्ती दि. 16 व 17 नोव्हेंबर 2017 रोजी तालुकास्तरावर प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाला प्रशिक्षीत करणार आहे.  व अशाप्रकारे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त करण्याच प्रयत्न होणार आहे.
 सदर कार्यशाळा जिल्ह्यातील प्रमुख अधिका-यांच्य उपस्थितीत पार पडणार आहे. तर सदर कार्यशाळेत राज्यस्तरीय प्रशिक्षक तसेच Nsf पूरस्कूत व म. रा शासन व्यसन मुक्ती कार्यकर्ता  पुरस्कार प्राप्त शिक्षक हरीश्चंद्र पाल व जहीर खान तसेच सलाम मुंबई फाउंडेशन जिल्हा समन्वयक आदेश नांदविकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.