Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २१, २०१७

निवडीच्या दिवशीच सरपंचासह चार व्यक्तींना अटक

बाजारगाव:- बाजारगाव येथून 4 किमी अंतरावर असलेल्या चिंचोली पठार येथे सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया झाली यामध्ये भाजप समर्थकांचा सरपंच व तीन ग्रामपंचायत सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक याचा उपसरपंच व तीन सदस्य अशी निवड झाल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी समर्थक बाजारगाव येथे मदिरा घेण्यासाठी येत असताना भाजप समर्थक सरपंच नंदकिशोर संतोष पुंड(३७) रा.चिंचोली पठार ,ता हिंगणा जि-नागपूर यांच्या दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात शाब्दिक वाद झाला. हा वाद दि २०/११/२०१७ ला साय.६ वाजता  बाजारगाव येथील पांजरा फाटा येथे झाला परंतु परिसरातील व्यक्तींच्या मध्यस्ती ने वाद संपविण्यात आला.
दोन्ही पार्टी रागाच्या भरात गावात गेलें परंतु आनंदात वादाचे विरजण पडल्यामुळे दोन्ही पार्टी बाजारगाव येथिल अफलातून बियर बार मध्ये दारू पिण्यासाठी आले व एक मेकांना शिवी गाळी करण्यास सुरुवात झाली शिवीगाळी चे रूपांतर हाणामारी त झाल्यामुळे लगेच कोंढाळी पोलिसांना कळविण्यात आले व दोन्ही पार्टी विरुद्ध १०७,११६,१५१ या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली यामध्ये भाजप समर्थक सरपंच नंदकिशोर संतोष पुंड(३७),दिवाकर श्रीकृष्ण मसराम (३४),तसेच राष्ट्रवादी समर्थक चंद्रशेखर मधुकर भालेराव(४८),विजय चेतराम लोहकरे(४०) व नरेंद्र देवेंद्र लोहकरे  यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास कोंढाळी पोलीस करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.