Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २०, २०१७

प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी मानव विकास कार्यक्रम



ब्रम्हपुरी/प्रतिनिधी :-
             प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी येथे शुक्रवारी ला सकाळी १०:३०वाजता मानव विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
       या मानव विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम स्त्रीरोगतज्ज्ञांकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली ,० ते ६ महिने वयोगटातील बालकांची व स्तनदा मातांची तपासणीकरण्यात आली ,त्यांना औषधोपचार करण्यात आले  , ६ महिने ते २ वर्षे वयोगटातील बालकांची बालरोगतज्ज्ञाकडून तपासणी करण्यात आली .

                 किशोरवयीन मुलींना पौगंडावस्थेतील आरोग्य व जीवनकौशल्ये विकसित करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले,
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येक महिन्यात किमान २ शिबिरे आयोजित करने , शिबिरे आयोजनाबाबतची माहिती सर्व संबधित ग्रामपंचायतींच्या आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना देण्यात येणे  शिबिराच्या ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व उपचार करून घेणे,एक वेळचा अल्पोपाहार लाभार्थ्यांना देण्यात येतो. गरोदर मातांचा व ६ महिन्यांपर्यंत स्तनदा मातांचा पाठपुरावा केला जातो.
          तसेच जोखमीच्या मातांना उपचार व संदर्भिय माहिती देण्यात आली.असून मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्र  देण्यात येणारे लाभ / सेवा
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने  लाभार्थ्यांना ने-आण करण्याकरिता केंद्राच्या वाहनाचा वापर करण्यात आला , शिबिरामध्ये लाभार्थ्याना  एक वेळ अल्पोपाहार देण्यात आला ,तसेच  इत्यादि माहिती डॉ.एम.एस.सुखदेवे मँडम वैधकिय अधिकारी यानी मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत दिली.

या कार्यक्रमाला डॉ.एम.एस सुखदेवे वैधकीय अधिकारी प्राथ.आ.केंद्र.गांगलवाडी,आरोग्य सेवक श्री.एस.के.धोटे,राऊत साहेब , चतट्टें साहेब ,बनकर साहेब ,सहारे मँडम ,चन्ने मँडम ,मैदमवार मँडम ,अलोन साहेब ,चहांदे साहेब ,बगमारे साहेब ,आदी वैधकीय कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.