Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर २४, २०१७

नागपूर मेट्रोचे पिल्लर पुन्हा कोसळले

नागपूर /प्रतिनिधी:
नागपुरातील भर गर्दीच्या म्हणून ओळखल्या जाणा-या मध्यवर्ती सीताबर्डी भागातून जात असलेल्या मेट्रोच्या बांधकामातील एक मोठा पिलर शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक कोसळला.परिसरातील  भिडे कन्या विद्यालयासमोरच्या मार्गावरील हा पिलर कोसळल्याने वाहतूक  ठप्प झाली.यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या घटनेवरून नागपूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा  ऐरणीवर आला आहे . गेल्या काही दिवसाअगोदर  देखील नागपूर येथिक मेट्रोच्या  बांधकामापैकी एक पिल्लर कोसळल्या  गेल्याची  घटना  समोर आली होती.या घटनेत २ अभियंत्यांना निलंबित देखील करण्यात  आले होते परत त्याच घटनेची पुनरावृत्ती आज घडली असून नागपूरकरांच्या सुरक्षा वाऱ्यावर आहे का असं प्रश्न उपस्थित होत आहे 

नागपूरः मेट्रोचे पोल कोसळल्याने वाहतूक विस्कळीत. कोणीही जखमी नाही.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.