आदिवासींच्या विविध संघटनांचा पोलीसांवर मोर्चा
रामटेक/ प्रतिनिधी- रामटेक पंचायत समीतीचे विस्तार अधिकारी (पंचायत) सी.एम.पाटील यांचेवर विनयभंग व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दिनांक 16/11/2017 रोजी रामटेकच्या पोलीस ठाण्यावर आदिवासी संघटनांनी मोर्चा नेला.
रामटेक पंचायत समीतीचे लंपटबाज विस्तार अधिकारी (पंचायत) सी.एम.पाटील यांचेवर विनयभंग व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत ग्रामसेविकेच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा भादंवीच्या कलम 354,354 (अ), 354(ड), सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-2015 कायद्याचे 3(2)व्ही(ए),3(आय)डब्लू(ए),3(1)(डब्लू)(2) कलमांखाली दाखल करण्यात आला आहे .या आरोपी अधिका-याला जि.प. प्रशासन तात्काळ निलंबित करणार का असा प्रश्न यानिमीत्ताने विचारला जात आहे.
आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॅाईज फेडरेशन तालुका शाखेच्या नेतृत्वात गोंडवाना गणतंत्र पार्टी,म.रा.ग्रामसेवक संघटना व स्थानीक आदिवासी लोकप्रतिनिधी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.मोर्चात मोठया प्रमाणावर ग्रामसेविका,ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच व कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की महादुलाच्या ग्रामसेविका यांना मानसिक त्रास देणाÚया व वाईट हेतूने हेतुपुरस्सर अपमानास्पद वागणूक देणारे विस्तार अधिकारी(पंचायत) सी.एम.पाटील यांचेवर तात्काळ गुन्हा नोंदविण्यांत यावा व त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यांत आली आहे.पंचायत समीतीच्या वरीश्ठ अधिकारी यांचेकडे पीडीता महीलेने यापुर्वी अर्जविनंत्या केल्या आहेत मात्र अद्यापही प्रशासनाकडून पाटील यांचेवर कुठलीच ठोस कार्यवाही करण्यांत आली नसल्याचे निवेदनांत नमूद करण्यांत आले आहे.
पाटील हे अतिशय लंपट अधिकारी असून ते महीला कर्मचारी,महीला पदाधिकारी यांचेशी जाणूणबुजून लगट करतात व त्यांच्या मनासारखे झाले नाही तर विविध प्रकारे त्रास देतात व अपमानास्पद वागणूक देतात असे बयान अनेक महीलांनी रामटेक पंचायत समीतीच्या कार्यालयांत दोन दिवसांपुर्वी आलेल्या जिल्हास्तरीय महीला तक्रार निवारण समीतीकडे नोंदविले आहेत असे कळते.
यावेळी फेडरेशनचे घनश्याम सर्याम,जे.डी.ईनवाते,हरिश्चंद्र सर्याम,धनराज मडावी,साधूराम वरखडे,जि.प.सदस्या दुर्गा सर्याम,शांता कुमरे,पं.स.रामटेकच्या सभापती किरण धुर्वे,उपसभापती छाया वंजारी,शितलवाडीच्या सरपंच योगीता गायकवाड,माजी नगराध्यक्शा माधुरी उईके,पं.स.सदस्य हरीसिंग सोरते,ग्रामसेवक संघटनेचे भारत मेश्राम,रवि रेहपाडे,हरीदास रानडे,मधुकर बांते,तेजराम झोडे,पंजाब चव्हाण,ज्ञानेश्वर नेहारे,श्रीकांत भर्रे,अनिल लिंगायत व विपुल भूरसे,गोंगपाचे जिल्हाध्यक्श हरीश उईके आदी उपस्थित होते.पोलीसांनी पीडीत महीलेला गुन्हा दाखल करून न्याय दिला आहे.जि.प.प्रशासन आरोपी पाटील यांना तात्काळ निलंबित करणार ,की पुन्हा थातुर मातुर चैकशी समीतीचा फार्स करणार याकडे सबंध जिल्हयाचे लक्श लागले आहे.