मुंबई:
वस्तू व सेवा कर ( GST) च्या दरात मोठे फेरबदल करत केंद्र सरकारने व्यापारी बांधव तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे . मुंबईतील काही व्यापारी संघटनांनी या अनेक उत्पादनाचे दर कमी करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे तसेच जीएसटी परिषदेत पाठपुरावा केला व नुकतेच काही वस्तूंचे दर कमी करण्यात आले.
13 नोव्हेंबर रोजी व्यापारी बांधवांच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले.यावेळी आ. राज पुरोहित , आ. मंगलप्रभात लोढा , माजी आमदार श्री अतुल शाह उपस्थित होते.
या शिष्टमंडळात फॅम संघटनेचे अध्यक्ष श्री विनेश मेहता, उपाध्यक्ष श्री जितेंद्र शहा श्री रसिक कोठारी, महासचिव श्री आशिष मेहता, सचिव श्री प्रितेश शहा यांच्यासह बँगल मर्चंट असोसिएशनचे श्री रमेशभाई, टिम्बर प्लायवूडमर्चंट असोसिएशन, बॉम्बे टिम्बर मर्चंट असोसिएशन, रेफ्रिजरेशन संघटनेचे राटा, मेटल असोसिएशनचे मासमा आदींची उपस्थिती होती.