नागपूर : आपल्या साथीदारांसह एका आरोपीने अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.
राहुल धनराज हाथीबेड (२१), आश्विन अशोक देशमुख (१९) सतीश जगदीश मेश्राम (२१) रा. कामगार कॉलनी, सुभाषनगर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पीडित १६ वर्षाचा विद्यार्थी आदित्य इशेंद्र मिश्रा हा बारावीचा विद्यार्थी आहे. आदित्यची हिमांशु हिरणवार नावाच्या मित्राच्या माध्यमातून राहुलशी ओळख झाली होती. काही दिवसांपासून कोणत्यातरी गोष्टीवरून राहुल आणि आदित्यमध्ये वाद सुरु होता. राहुलने त्याला वर्डशॉप मेसेज पाठवून धमकी दिली होती. तो आदित्यला ‘तेरे मे दम है तो सुभाषनगर मे आ’ अशी धमकी देत होता. सोमवारी दुपारी १२.३० वाजता आदित्य भाऊराव सुर्वे उद्यानात आला होता. त्याच्यासोबत हिमांशुही होता. याची माहिती मिळताच राहुल दोन्ही साथीदारांसोबत उद्यानात पोहोचला. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी आणि दंड्याने आदित्यला मारहाण केली. जखमी केल्यानंतर त्याला अॅक्टीव्हावर बसवून सुभाषनगरकडे घेऊन गेले. पुढे धोका असल्याचे पाहून हिमांशुने पोलिसांना सूचना दिली. प्रतापनगर पोलिसांनी सुभाषनगर चौकाजवळ आरोपींना अटक करून आदित्यला त्यांच्या तावडीतून सोडविले. पोलिसांनी अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.