Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर ०४, २०१७

सीनाळ्याचे गावकरी म्हणतात खानच बंद करू


चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील सीनाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सीनाळा,नवेगाव,मसाळा,मसाळा,(तू)या चारही गावातील लोकांना त्यांच्या शेतीचा मोबदला मार्च महिन्यापासून देण्यात येत आहे .मात्र आर.आर.  पॉलिसी अंतर्गत तात्काळ  रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रक्रियाआहे मात्र  आजही गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मार्च नंतर आज परियंत सात महिने उलटून गेले.तरी मात्र नौकरीचे आश्वसन देऊन नौकरी दिल्या गेली नाही.सोबतच या चारही गावाचे पुनर्वसन देखील आजपरियंत झालेले नाही.मार्च २०१६ ला जेव्हा गावातील नागरिकांनी कां बंद करण्याचा इशारा दिला होता तेव्हा खान  व्यवस्थापक यांनी गावकऱ्यांसोबत मध्यस्ती करत प्रपत्र क्रमांक ९२० ३/९/२०१६  अंतर्गत झालेल्या मध्यस्ती नंतर आश्वासन देऊन देखील आश्वासन पूर्ण केले नाही.

या चारही गावातील मोबदला धारक  हे शेतकरी आहेत.मात्र जमिनी आदिग्रहीत करून आज परियंत या शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने गावकऱ्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या सात दिवसात जर खान व्यवस्थापकाने यावर परिपूर्ण तोडगा जर काढला नाही तर सीनाळा गावाला लागलेल्या खाणीचे  काम बंद पाडू असा इशारा गावकर्यांनी आज पत्र परिषदेत दिला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.