Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर २४, २०१७

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

कळमेश्वर :
  कर्जाची परतफेड करण्याच्या चिंतेने ग्रासलेल्या तरूण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली़ ही घटना स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ब्राम्हणी येथे गुरूवारच्या रात्री घडली़
मिळालेल्या माहितीनुसार ब्राम्हणी येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये राहणारा सेवकराम चचाने 32 व इतर दोन भावा मिळून तीन एकर शेती आहे़  त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा याच शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे़ मात्र, गेल्या तीन वर्षा होत असलेल्या सत्ततच्या नापीकीमुळे सेवकरामला कर्ज घ्यावे लागले़  घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार ही चिंता त्याला नेहमी सत्तावित होती़ शेवटी कंटाळून सेवकरामने गुरूवारच्या रात्री कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली़ त्याच्या पशच्यात वृध्द आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.