पारशिवणी/प्रतिनिधी :
तालुक्यातील टेकाडी येथे श्री कृष्ण मंदिरात कीर्तनाला सुरवात झाली ती महानुभाव पंथातील संत मयानंद महाराज यांच्या प्रपंचाचा सार सांगणाऱ्या चार चरणाच्या अभंगा पासून महानुभावातील तत्वज्ञान सांगत जगाच्या पाठीवर जीवनाचे तत्वज्ञान त्यांच्या अभंगातून मांडत,जगा मध्ये जीवन कशे जगावे,समाजात कशे वावरावे,कुठल्या पद्धतीने जगावे काय आचरणात आणावं काय आचरणात आनु नये याचा सार अभंगांमधून मांडत कीर्तनाला आलेल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडलं.कीर्तनात शास्त्रांबद्दल बोलतांना प्रत्येक पंथाने आप आपल्या धर्म ग्रँथांचे वाचन करणे गरजेचे असून ते वाचून आचरणात आणनेही महत्वाचे आहे तेव्हा शास्त्रांचे अध्ययन करा निव्वळ काण फुकुन गुरू करण्यात अर्थ नाही अशे प्रबोधन टेकाडी येथे भगवान श्री दत्तात्रेय प्रभू जयंती महोत्सवा दरम्यान प.पु.प.म. श्री.कळमकर बाबा महानुभाव यांनी आपल्या कीर्तनाच्या कार्यक्रमा मधून केले.
प्रपंच व आश्रम व्यवस्थेवर देखील त्यांनी उत्तम रित्या प्रकाश टाकत धर्म,अर्थ,काम,मोक्ष तर ब्रह्मचर्य,गृहस्थ,
वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम या चार आश्रम व्यवस्थेमध्ये माणसाची जीवन जगण्याची प्रक्रिया आधारलेली असते.ज्यात धर्माने मोक्ष आणि अर्थाने काम साध्य समजल्या गेलेलं आहे.ब्रह्मचर्य आणि गृहस्थ जीवना मध्ये धर्म,अर्थ आणि काम याचे महत्व आहे.तर वानप्रस्था आणि संन्यास मध्ये धर्माचा प्रचार व मोक्षाचे महत्व मानल्या गेले आहे.आणि गृहस्थ जीवना मध्ये धर्म,अर्थ आणि काम चे महत्व आहे.ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म चर्चेत रत राहिने तर दूसरा प्रचलित अर्थ म्हणजे इंद्रियांनवर संयम ठेवणे तेव्हा युवा विद्यार्थी वर्गाने आपल्या इंद्रियांवर वयाच्या २१ वर्षा पर्यंत सय्यम ठेवायला पाहिजे कारण ब्रम्हचर्य म्हणजे ऊर्जेचा केलेला संग्रह आणि मनावर मिळवलेला विजय होय.तेव्हा मनुष्य असो की संत,देव असो की डाकू आयुष्यात ब्रम्हचर्या चे पालन अत्यंत महत्वाचे असल्याचे प.पु.प.म. श्री.कळमकर बाबा यांनी आपल्या कीर्तनातुन युवा वर्गाला संबोधित केले.
श्री कृष्ण मंदिर टेकाडी (को.ख.) येथे भगवान श्री दत्तात्रेय प्रभू जयंती महोत्सवाला २६ नोव्हेंबर पासून प्रारंभ झालेला आहे.दररोज सकाळी देवाला उटी स्नान व विळा अवसराचा कार्यक्रम महानुभाव भक्तांन कडून केला जातो अयोजकांतर्फे ता.२९ नोव्हेंबर ला प.पु.प.म.श्री.कळमकर बाबा महानुभाव यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता कार्यक्रमाला ग्रामस्थानी गुलाबी थंडीचा आनंद घेत भरभरून प्रतिसाद दिला किर्तना साठी तबल्यावर अरविंद वासाडे,हार्मोनियम वर गंगाधर आकोटकर तर गायना साठी किशोर वासाडे,कमलाकर बोराडे,प्रकाश बोराडे,मनोज बोराडे,अतुल खेडकर,दिलीप उमप,अभिजित कुरडकर यांनी साथ दिली तर कीर्तनाला प्रमुख उपस्थितीत प्रतिदिन प्रवाचक प.पु.प.म. श्री.माधवव्यासबाबा उपाख्य प.पु.प.म. श्री.महंतबाबा चिरडे ब्रम्हगिरी देवळी,भगवत पाठ ,दत्तात्रेय स्रोत प्रवाचक प.पु.ई. श्री.हरिपालदादा न्यायबास काटोल यांची उपस्थिती होती.येत्या ०२ डिसेंबर ला प्रभूंची पालखी व शोभायात्रा निघणार असून ०३ तारखेला कार्यक्रमाची सांगता दहीकाला व महाप्रसादाने होणार आहे तेव्हा श्री कृष्ण मंदिर पंचकमेटी तर्फे कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.कार्यक्रमाल यशस्वी करण्यासाठी श्री कृष्ण मंदिर पंच कमेटी, श्री दत्तसेवा मंडळ,महानुभाव मंडळ,श्रीकृष्ण महिला मंडळ टेकाडी यांनी सहकार्य केले.