Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १९, २०१७

अनिकेत कोथळे खूनप्रकरण अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

☀☀

सांगली /प्रतिनिधी
सांगलीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्या प्रस्तावाला अ‍ॅड. निकम यांनी होकारही दिला आहे. आम्ही सांगलीकर जनतेला दिलेला शब्द पाळला आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी  बोलताना दिली.

ते म्हणाले, अ‍ॅड. निकम यांच्या नियुक्तीचा मी शब्द दिल्यानंतर त्याबाबत उलट-सुलट चर्चा घडवून काहींनी राजकीय टीका करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, निकम यांच्याशी मी चर्चा केली, तरी गृहमंत्री या नात्याने त्यांच्या नियुक्तीचे अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहेत. त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय होईल, असे मी सांगलीतही सांगितले होते. केसरकर म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी अ‍ॅड. निकम यांच्याशी संपर्क साधला. त्याला अ‍ॅड. निकम यांनीही शुक्रवारी अहमदनगर येथील भेटीत दुजोरा दिला. त्यांनी हा खटला चालविण्यास होकारही दिला आहे. आता रीतसर आदेश होऊन अ‍ॅड. निकम सांगलीत येतील. या खटल्याबाबत कार्यवाही सुरू करतील.याप्रकरणी पोलिस खात्यातील वरिष्ठांचीही चौकशी करून योग्य कारवाईद्वारे अनिकेतच्या कुटुंबीयांना न्याय देऊ, असेही केसरकर म्हणाले.

दरम्यान, सीआयडीचे विशेष महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी अनिकेतला शहर पोलिस ठाण्यातील ज्या खोलीत मारण्यात आले, त्या ठिकाणाचीही पाहणी केली. त्यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाचा धावता आढावा घेतला. सकाळी साडेअकराच्या सुमारास डॉ. काळे शहर पोलिस ठाण्यात आल्या. दुपारी अडीचपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. साडेतीनच्या सुमारास डॉ. काळे यांना पुन्हा बोलावण्यात आले. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.

अनिकेतच्या कुटुंबीयांना न्याय देऊ,

केसरकर म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी अ‍ॅड. निकम यांच्याशी संपर्क साधला. त्याला अ‍ॅड. निकम यांनीही शुक्रवारी अहमदनगर येथील भेटीत दुजोरा दिला. त्यांनी हा खटला चालविण्यास होकारही दिला आहे. आता रीतसर आदेश होऊन अ‍ॅड. निकम सांगलीत येतील. या खटल्याबाबत कार्यवाही सुरू करतील.याप्रकरणी पोलिस खात्यातील वरिष्ठांचीही चौकशी करून योग्य कारवाईद्वारे अनिकेतच्या कुटुंबीयांना न्याय देऊ, असेही केसरकर म्हणाले. सांगली एस.पी. शिंदे, डीवाय.एस.पी. काळे यांची चौकशी अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीआयडीचे विशेष महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी शनिवारी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची कसून चौकशी केली. त्यासाठी रामानंद यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. त्यांनी काही कागदपत्रेही जप्त केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.