Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

मुख्यमंत्र्यांविषयी संताप: भावना दुखावल्याची तक्रार


भद्रावती नाभिक संघटनेने दिले निवेदन

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी)  :- नाभिक समाजाविषयी अपशब्द वापरल्या प्रकरणी मंगळवारी भद्रावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात बोलताना नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने नाभिक समाजात असंतोष निर्माण झाला आहे. नाभिक समाजातील विविध प्रकारच्या संघठनांतर्फे काल भद्रावती तहसील कार्यालयात गेलेल्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नाभिक समाज संघटनेचे बंडू लांडगे, सचिन नक्षीणे, नाभिक दुकानदार संघठनेचे रविंद्र शेंडे, अंकुश दर्वे जेष्ठ नागरिक संघठनेचे बाबुराव जुनारकर महिला संघटनेच्या माया चिंचोलकर, वर्षा वाटेकर, शोभा लांडगे, छाया जमदाडे, गौरी नक्षीणे नाभिक महामंडळाचे निलेश देवईकर सागर घुमे आशीष चौधरी यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.