Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

इम्रान खान यांची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) :

भद्रावती शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टिचे युवा नेतृत्त्व इम्रान अफजल रफीक खान यांची भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, वित्त, वने आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री संजय देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे यांनी सदर नियुक्ती केलेली आहे.
 सदर नियुक्तीबाबत जेष्ठ भाजपा नेते व वरोरा विधानसभा क्षेत्राचे प्रभारी विजय राऊत, भाजपा जिल्हा सचिव राहुल सराफ, वरोरा नगराध्यक्ष अहतेशाम अली, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, शहर महामंत्री प्रशांत डाखरे, किशोर गोवारदिपे, माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, माजी नगरसेवक सत्तारभाई, मनोज आष्टनकर, बाळू उपलंचीवार, कामरान खान, सतिश आष्टनकर, सचिन गरडकर, सागर पहाणे, गोविंदा बिंजवे, राजेश कांबळे, विवेक वाढई, तौसीफ शेख, हरी खोब्रागडे, वसीम पठाण, नदीम पठाण, आशीष पोटे आदींनी नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.