नागपूर : अनेक वर्षांपासून प्रलंबित मिहान प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. विमानतळ विकासासाठी टाटा रिअॅलिटी, जीएमआर इन्फ्रा, जीव्हीके, पीएनसी इन्फ्राटेक व एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्या अंतिम शर्यतीत आहेत. विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) कंपनीने तयार केलेला ‘आरएसपी’ फॉर्मेट राज्य शासनाकडे पाठविला असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राज्य शासनाने त्यावर तातडीने निर्णय घेतल्यास या पाच कंपन्यांकडून ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोझल’ (आरएसपी) अर्थात जी कंपनी अधिकाधिक महसूल मिळवून देण्याचे हमीपत्र देईल, त्या कंपनीला विमानतळ विकास संचालनाची जबाबदारी दिली जाणार आहे.
नागपूर विमानतळाचे डिसेंबरअखेर खासगीकरण