Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर ०१, २०१७

केईएममध्ये शिवसैनिकाचा हल्लाबोल;व्हिडिओ व्हायरल

मुंबई /प्रतिनिधी:
शुक्रवारी घड़लेल्या एलफिन्स्टन रेलवे हत्याकांडानंतर मृतांच्या कपाळावर नबंर टाकून केईएम रुग्णालयाच्या बाहेर लावलेल्या एका बॅनरमध्ये मृत व्यक्तींचे चेहरे लावण्यात आले.यात मृत व्यक्तींच्या कपाळावर क्रमाक टाकन्यात आले होते. त्यानंतर केईएम प्रशासनावर देशभरातून जोरदार टीका करण्यात आली.हा बॅनर सोशल मीडियावर पसरत गेला आणि अतिशय असंवेदनशील, निंदनीय कृत्य असल्याची चर्चा सोशल मिडियावरुन होऊ लागली.हाच राग मनात धरून एक शिवसेना लिहिलेली भगवी टोपी घालून व्यक्ति डॉक्टरांना जाब विचारत केईएमचे फोरेन्सिक विभागाचे प्रमुख, डॉ. हरिश पाठक यांच्या कक्षात शिरला तुम्ही मानुसकी शून्य आहात ,मृतांच्या कपाळावर अश्या प्रकारचे नंबर का टाकले असा त्याचा सवाल होता याचा हरिश पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार ते नंबर टेम्पररी टाकण्यात आले होते, मात्र त्याच वेळी फोटो काढले गेल्यानं ते व्हायरल झाले.
असे त्यांचे म्हणणे होते. रुग्णालयातील लोकांनी त्याला नाव विचारले असता निलेश धुमाळ असे सांगितले.नेमके काय घडले ते खालच्या लिंक
वर क्लिक करूण
पाहा या व्हिडीओमध्ये….
https://www.youtube.com/watch?v=cFOjMiYXTfM




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.