Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर ०८, २०१७

मेरा पी. एम. फेकू है !

हातावर गोदवून काँग्रेस चे आगळे वेगळे आंदोलन
वरोरा/प्रतिनिधी:
वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटी तर्फे रविवारला स्थानिक गांधी चौकात " मेरा पी. एम. फेकू है " असे हातावर गोदवून आगळे वेगळे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
कॉग्रेस सरकारला गॅस सिलेंडर 396 रुपयांपर्यंत नेण्यास 45 वर्ष लागली मात्र भाजप सरकारने 3 वर्षात 396 रुपयाचे सिलेंडर 784 रुपया पर्यंत पोहचविले आतंरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाची किंमत कमी होत असनानाही पेट्रोल - डिझेलची भरमसाठ दरवाढ एका महिन्यात पेट्रोलच्या किमतीत 16 रुपयाची दरवाढ करण्यात आली . शेतमालाचा उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफाजोडून हमीभाव देण्याची घोषणा करण्याऱ्या भाजप - सेना सरकारच्या कार्यकाळात शेतमालाला भाव नाही . तसेच शेतकऱ्याच्या आत्महत्येत वाढ व तत्त्वता किचवट नियमाची फसवी कर्जमाफी , नोटबंदी मुळे काळा पैसा सापडलाच नाही मात्र सामान्य नागरिकांची वाट लागली . उद्योग धंदे डबघाईस आले असून अर्थ व्यवस्थेची पूर्ती वाट लागली आहे . एवढेच नाही तर ' एक के बदले दस सर लाऊगा ' म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात अतिरेकीदहशतवादी घटनांमध्ये वाढ त्यामुळे देशातील 799 जवानांहा तीन वर्षात आपला जीव गमवावा लागला दर वर्षी देशात 2 करोड नवीन रोजगाराच्या संधीउपलब्ध करून देण्याची घोषणा मोदी सरकारने केली मात्र प्रत्यक्षात सरकारचे चुकीचे धोरण नॉटबंदी मुळे छोटे,मद्यम व्यापारी व उद्योग धंद्यात प्रचंड फटका बसल्याणे बेरोजगारी मध्ये वाढ झाली.एवढेच नाही तर 45 लाख गरीब कुटुंबियांहा रेशन कार्ड वर मिळणारी साखर बंद केली त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून आता गरिबांहा साखर मिळणार नाही.जीवनावश्यक वस्तूची भाव वाढ विजेची झालेली दर वाढ करून जनतेची फसवणूक या सरकारने केली आहे विदेशी बँकेतील काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख मोफत देण्याची मोदी सरकारची घोषणा फसवी ठरली.15 लाखापैकी 5 रु.तरी जनतेला मिळाले का ?अश्या विविध मुद्यांहा घेऊन काँग्रेस पक्ष्यांकडून रविवारला आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले या वेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांही भा ज प सरकार विरोधी नारे देत 'मेरा पी एम फेकू है 'असे हातावर गोदऊन घेतले.यावेळी मंचावर काँग्रेस नेते डॉ विजय देवतळे,डॉ आसावरी देवतळे(जी.प.सद्यस्य तथा सचिव काँग्रेस कॅमेटी)माजी नगराध्यक्ष विलास टिपले,माजी जी.प.सद्यस्य कान्ह्यालाल जयस्वाल,सुंनंदाताई जीवतोडे(जी प सद्यस्य तथा महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष)संजीवनी भोयर(प स सद्यस्य)जेष्ठ नेते वसंतराव विधाते,विठ्ठल टाले (नगरसेवक न प वरोरा)पुरुषोत्तम निखाडे, मनीष जैस्वाल, राजुभाऊ जाजुरले,गिरीधर कष्टी, मिलिंद भोयर,शिरोमणी स्वामी,नलिनी आत्राम,दुर्गा ठाकरे,स्वाती भोयर,इकबाल सिद्दीकी,रामभाऊ ताजने,चिंतामणी आत्राम,विनोद लांबट,जयश्री सरोदे,माया डोंगरे,शंकर खैरे,आदर्श आवारी, समर्थ बोढे, अजय ठाकरे,विकास धनदरे,,पुरुषोत्तम कुडे, नारायण निखाडे,गोपाळ घाटे,निखिल सरोदे,मंगेश मासाडे,सोमदेव कोहाड, सचिन भोयर,शुभम चांभारे, अमोल सेलकर,सलीम पटेल,इकबाल शेख,चरण मोडक,व शेकडो काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.