सात जणांना अटक : नागपूर जिल्ह्यातील चार जणांचा समावेश
बुटीबोरी, : बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अवैध मार्गाने जाणाऱ्या दारूचा साठा बुटीबोरी पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. याशिवाय अवैध दारू नेताना आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले.
एमआयडीसीतील इंडो रामा गेट क्र. 3 च्या समोर 27 मे रोजी पहाटेच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांना काही व्यक्ती संशयास्पद स्थिती दिसले. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडील महिंद्रा एक्सयुव्हि कार (क्र. एमएच-31/ ईए- 8787) ची तपासणी करण्यात आली. त्यात मॅकडोनॉल्ड नं. 1-व्हिस्की, प्रत्येकी 180 एमएलच्या 201 बाटल्या, ऑफिसर्स चॉईस व्हिस्की प्रत्येकी 180 एमएलच्या 34 बाटल्या आढळल्या. ही या दारूची किंमत 45 हजार 300 रुपये आहे. याप्रकरणी चंद्रपूरच्या राहुल रवींद्र गिरी (वय 22), भारत किसन पडेलवार (वय 22) आणि एका महिलेचा समावेश आहे. याशिवाय उमेश गोपाल धुर्वे (वय 28, रा. खापरखेडा), गणेश बापूराव पाटील (वय 34, रा. कामठी) विजय राजकुमार शर्मा (वय 27, रा. कन्हान), रॉकी धनराज संतापे (वय 32, रा. कामठी) यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल दौंड करीत आहेत.