Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २७, २०१५

चार वाजंत्री ठार

लग्नाच्या वाहनाला अपघात

ट्रकने टाटा सुमोला चिरडले

कन्हान (जि. नागपूर) : मौदा तालुक्‍यातील रेवराल येथून नागपूर येथे विवाहासाठी जाणाऱ्या बॅंण्ड पार्टीच्या टाटासुमोला ट्रकने चिरडले. यात चार जणांचा मृत्यू झाला. सहा जण गंभीर आहेत. ही घटना कन्हान परिसरातील नीलज (खंडाळा) गावाजवळ बुधवारी (ता. 27) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. मृतात गणपत रामाजी हरकंडे (वय 28, रा. रेवराल), राष्ट्रपाल सुखराम बावणे (वय 27) मु. पो. टावेपार (भंडारा), राजू सोनवाने, कपूरचंद लाडेकर यांचा समावेश आहे.
रेवलराल येथील बेबीताई ठाकरे यांच्या मुलाचा विवाह नागपूर येथे होता. वरपक्षाची मंडळी सकाळीच निघाली. टाटो सुमो (क्र. एम.एच. 31 झेड-06335) मध्ये सर्व बॉण्ड पार्टीचे वाजंत्री बसले होते. हे वाहन तारसा-कन्हानमार्गे जात असताना नीलज (खंडाळा)जवळ समोरून आलेल्या दहाचाकी ट्रक (क्र. एम.एच. 49-0508)ने जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने भरधाव होती. त्यामुळे ट्रकने सुमोला रस्त्याच्या खाली फरफटत नेत चिरडले. यात सुमोचा चेंदामेंदा झाला. यात गणपत रामाजी हरकंडे (वय 28, रा. रेवराल) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. यात बसलेले सर्वजण गंभीर जखमी झाले. वाहनात फसलेल्या सर्वांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, राष्ट्रपाल सुखराम बावणे (वय 27) मु. पो. टावेपार (भंडारा) याचा मेयो रुग्णालय नागपूर येथे हलविल्यानंतर मृत्यू झाला. अतिगंभीर जखमीत राजू सोनवाने, कपूरचंद लाडेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक अनोळखी व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मेयोतील वॉर्ड क्रमांक 21मध्ये जितेंद्र ताराचंद वाढवे (वय 24, पुजारी टोला गोंदिया), रामा जगन हरकंडे (वय 50), बबन केशवराव लेंढे (वय 42, रा. रेवराल), गणेश मारोतराव शेंडे (वय 30, रा. कोदामेंढी), पंकज सुखराम बावणे (वय 26, टावेपार, जि. भंडारा) यांना भरती करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.