Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे १४, २०१५

अंधारलेला गुन्हेगारीला प्रकाशाचे दिवा'ण'

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून संदीप दिवाण लवकरच येत आहेत. नाशिक शहरात तीन वर्षांपासून असलेले गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप दिवाण यांची चंद्रपूर येथे पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे. अंधारलेला गुन्हेगारीला प्रकाशाचा दिवा'ण' मात करेल अशी आशा आहे.

Designation: Superintendent of Police/ चंद्रपूर 
जन्म : 1 जून 1972
श्री संदीप दिवान B.E. आणि L.L.B. चे शिक्षण घेतले आहे. कायदा आणि सुव्यवस्था यात पारंगत आहेत. M.P.S.C. परीक्षा पास झाल्यावर उप पोलीस अधीक्षक म्हणून 1996 मध्ये प्रशिक्षण. अहमद नगर येथे उप पोलीस अधीक्षक म्हणून पहिल्यांदा निवड झाली. त्या नन्तर चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर येथेही काम केले. नाशिक येथे शहर पोलिस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून सेवेचा मोठा अनुभव आहे. गुन्हे विभाग, विशेष पथकाचे त्यांनी नेतृत्व केले आहे.

आठवणीतील कारवाई
सावली (जि. चंद्रपूर) - येथील महिला तहसीलदार नीता भैसारे यांना रेती व मुरूम पुरवठादार किशोर आत्राम यांच्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर येथे उपायुक्‍त असताना संदीप दिवाण यांनी  नीता भैसारे यांच्या आरमोरी येथील निवासस्थानाची झडती घेऊन दोन लाख 25 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. 

२०१०मध्ये एसीबीचे तत्कालिन अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजेश दुद्धलवार यांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील (माफसू) पदभरती घोटाळ्यात अखेर १४ जणांवर शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल केले. दोन वर्षांच्या सखोल चौकशीनंतर ३,८८० पानांचा अहवाल तयार करण्यात आला. या प्रकरणात एकूण ५० जणांवर दोषारोप ठेवून ९ मे २०१२ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपी तत्कालीन कुलगुरू डॉ. अरुण निनावे याच्या दिल्लीतील निवासस्थानाची झडती घेतली होती. यात नागपुरातील लाखो रुपयांच्या खरेदी-विक्रीचे दस्तऐवज आढळले. ते जप्त करण्यात आले होते. डॉ. निनावे याच्याशिवाय पथकाने तत्कालीन कुलसचिव डॉ. ढोबळेच्याही घराची झडती घेतली. झडतीदरम्यान पथकाला डॉ. ढोबळेची स्टेट बँक ऑफ इंडियात पाच लाखांची जमाठेव आढळली.


गृहमंत्रालयाने बुधवारी सायंकाळी पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांची आणि पदोन्नतीची यादी जाहीर केली. त्यात नाशिकचे पोलीस उपायुक्त संदीप दिवाण यांच्याही नावाचा अंतर्भाव आहे.
चंद्रपूरचे विद्यामान जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांचे स्थानांतरण लाच लुपचत प्रतिबंधक विभागाचे नागपूर जिल्हा पोलीस अधिक्षक या पदावर झाले आहे. २२ मे २0१२ रोजी राजीव जैन चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून रूजू झाले होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा होती. आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून ते नागपूरला जात आहेत. अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव यांचेही स्थानांतरण झाले असून त्यांना अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्यांच्या जागेवर मालेगाव येथील अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल कडसणे येत आहेत. येत्या आठवडाभरातच नवे अधिकारी आपल्या पदावर रूजू होत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.