Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १३, २०१५

भूकंपाच्या भीतीने पर्यटक माघारले

कामठी - मंगळवारी नेपाळसह उत्तर भारतात पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. पश्‍चिम बंगालमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या कामठी, नागपूर येथील 40 पर्यटकांनी हा धक्का अनुभवला आणि भूकंपाच्या भीतीने सर्वजण परतीच्या मार्गावर आहेत.
नागपुरातील जुना सक्करदरा, कामठीच्या नागसेननगर व न्यू खलाशी लाइन येथील 40 नागरिक बुद्धगया, सारनाथ, नालंदा यांसह पश्‍चिम बंगाल येथील पर्यटन स्थळाचे दर्शन करण्याकरिता पाच मे रोजी गेले. ते 20 मे रोजी परत येणार होते. यापूर्वी आलेल्या भूकंपामुळे नेपाळचा दौरा रद्द करण्यात आला. नागसेननगर व न्यू खलाशीलाइन येथील प्रतीक्षा अमरदीप घोडके, अमरदीप घोडके, सत्यफुला खांडेकर, शीतल विश्वदीप घोडके, विश्वदीप घोडके, कुसुम घोडके, श्रीराम घोडके, रिया अमरदीप घोडके यांच्यासह 40 जण टॅव्हल्स बसने रवाना झाले. आपल्या पर्यटन स्थळाचा अर्धा दौरा पूर्ण करून ते 12 मे रोजी सकाळी पश्‍चिम बंगाल येथील दार्जिलिंग या प्रमुख पर्वतस्थळावर पोहोचले. पर्वतावरील एका दुकानात असताना अचानक त्यांना जमीन हलण्याचे जाणवले. अचानक आलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे एकच धावपळ सुटली. लोकं इकडे-तिकडे आपला जीव वाचवण्याकरिता पळू लागले. ज्यांच्या कुटुंबातील लहान मुले होती त्यांनी आपल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कामठीतील पर्यटक पर्वतावरून उतरून आपापल्या ट्रॅव्हल्स बसकडे निघाले. सुदैवाने तेथे कोणतीही हानी झाली नसल्याचे प्रतीक्षा घोडके यांनी "सकाळ‘च्या बातमीदाराला दूरध्वनीवरून सांगितले. अचानक आलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍याने हादरलेल्या सर्व पर्यटकांनी कार्यक्रम रद्द करून परतीच्या मार्गावर निघाले आहेत.


चेहऱ्यावरची चिंता दूर झाली
पश्‍चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक स्थलांतरित नागरिक नागपूर आणि जिल्ह्याच्या अनेक शहरात वास्तव्यास आहेत. मंगळवारी आलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे अनेकांनी आपल्या नातलगांना दूरध्वनी करून घटनेची माहिती जाणून घेतली. ओंकारनगर येथे सायकल दुरुस्तीचे काम करणारा दिलीप गेल्या 20 वर्षांपासून येथे स्थायिक आहे. तो मूळचा नालंदा (बिहार) जिल्ह्यातील. भूकंप झाल्याचे कळताच त्याने घरी फोन केला. सर्वजण सुखरूप असल्याचे कळताच त्याच्या चेहऱ्यावरची चिंता दूर झाली होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.