Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १५, २०१५

चोरट्याचा आत्महत्येचा प्रयत्न ब्लेडने केले गळ्यावर वार

नागपूर : गुन्हे शाखा पोलिस आपल्याला खोट्या गुन्ह्यात फसविणार या भितीपोटी एका घरफोड्याने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने तीन वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ११.३० च्या सुमारास सिव्हील लाईन स्थित प्रशासकीय इमारत क्र. १ मधील गुन्हे शाखा कार्यालयात घडली.
प्रविण दादाराव वंजारी (२८) रा. भिमनगर, रामेश्वरी रोड असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-याचे नाव आहे. प्रविणने प्रेमविवाह केला असून त्याला पत्नी व एक पाच वर्षाचा मुलगा आहे. पत्नी एका खाजगी रुग्णालयात काम करते. त्याचे आई-वडील प्रतापनगर हद्दीत राहतात. लग्नाच्या आधीपासूनच तो चोरी आणि घरफोडी करण्याच्या प्रवृत्तीचा आहे. शहर पोलिसांनी यापूर्वी त्याला दोन वर्षाकरीता तडीपार केले होते. वर्धा जिल्ह्यात तडीपारीचे दिवस काढले. नोव्हेंबर २०१४ मध्ये तडीपारी संपवून त्याने पत्नी व मुलासह परत नागपूर गाठले. मात्र यावेळी भिमनगर येथे बागडे यांच्या घरी किरायाची खोली घेऊन तो पत्नी व मुलासह राहतो. मात्र आज सकाळी गुन्हे शाखा पोलिसांच्या चार्ली कमांडोने नियमीत चौकशीचा भाग म्हणून त्याला गुन्हे शाखा कार्यालयात आणले होते. दरम्यान प्रविणने नजर चुकवून आपल्याजवळील ब्लेडने गळ्यावर तीन वार करुन घेतले. रक्तबंबाळ प्रविणला बघून पोलिसांचे अवसानच गळाले. घाबरलेल्या पोलिसांनी लगेच त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर शध्Eाक्रिया केली. प्रविणच्या पत्नीच्या मते, आत्महत्येच्या प्रवृतीचा असून त्याच्या गळ्यावर यापूर्वीच्याही गळा चिरल्याच्या खुना आहेत. याप्रकरणी सदर पोलिसांनी प्रविणविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.