Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १५, २०१५

चोरट्याने फोडला डोळा

नागपूर : एका ऑटो चालकाच्या घरात चोरटा शिरला. चोरीचा प्रयत्न करणार तोच घरात झोपून असलेल्या ऑटो चालकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. मग काय, चोर-चोर म्हणून आरडाओरड करुन चोरट्याशी त्यांनी दोन हात केले. मात्र चोरट्याने फायटरने प्राणघातक हल्ला करुन त्यांचा एक डोळा फोडला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी फिर्यादी ऑटो चालकाच्या तक्रारीवरुन गिट्टीखदान पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र त्याला अटक करण्याऐवजी अभय दिल्याचा आरोप आहे. शेख गनी (४८) रा. गिट्टीखदान, बोरगाव, वेलकम सोसायटी प्लॉट नं. १०७ असे फिर्यादी जखमी ऑटो चालकाचे नाव आहे. सोहेल रा. बोरगाव असे चोरट्याचे नाव आहे. तो गुंडप्रवृत्तीचा असून स्थानिक पोलिस 'ाण्यातील काही कर्मचाNयांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्याची परिसरात प्रचंड दहशत आहे. शेख गनी हे ऑटो चालक आहेत. त्यांना पत्नी व दोन लहान मुले आहेत.
काही वर्षापूर्वी त्यांनी फायनांसवर ऑटो विकत घेतला होता. सुरुवातीला ते दरमहा प्रिमियम भरत गेले. मात्र मधल्या काळात प्रिमियन थकल्याने कर्जासोबत व्याजाचेही डोंगर वाढले. त्यामुळे घरची बिकट परिस्थिती बघता, त्यांनी ऑटोच विवूâन टाकला. चोरटा वस्तीतीलच असल्याने त्याला याची कल्पना असावी, त्यामुळे रकम चोरी करण्याच्या उद्देशाने त्याने घरात प्रवेश केला. सोमवारी घटनेच्या दिवशी शेख गनी यांची पत्नी मो'्या मुलाला घेऊन बाजारात भाजी आणण्याकरीता गेली होती. दरम्यान रात्री ९.३० च्या सुमारास चोरट्या सोहेल हा त्यांच्या घरात शिरला. मात्र ऑटो चालक गनी यांचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी त्याच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने फायटरने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा एक डोळा पुâटला. शेख गनी यांच्यावर मेयो रुग्नालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी चोरट्याला वेळीच अटक करण्याऐवजी त्याला अभय दिल्याचा गनी यांच्या पत्नीच्या आरोप आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक सुनिल बोंडे यांच्याशी संपर्वâ करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.