Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर २०, २०१४

चंद्रपुरात आज तुकडोजी महाराज साहित्य संम्मेलन

 चंद्रपुर- श्री गुरूदेव सेवा मंडळ आणि भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांताच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ डिसेंबरला चिमूर तालुक्यातील नेरी येथे  श्रीतुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गुरूकुंज मोझरी येथील अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी रुपराव वाघ असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन रविवार (२१ डिसेंबर)ला सकाळी १० वाजता राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे उपस्थित राहतील. दु. ४ वाजता होणाºया समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष तथा साहित्यीक डॉ. राजन जयस्वाल, भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांताचे संयोजक प्रा. डॉ. सुभाष लोहे उपस्थित राहणार आहेत. २१ डिसेंबरला सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत प्रतिनिधी नोंदणी, ९ वाजता राष्टÑसंत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ‘राष्टÑसंतांचे अध्यात्मचिंतन व आध्यात्मिक कार्य’ या विषयावर पहिला परिसंवाद होईल. या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून अमरावती येथील प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख असणार आहे. तर नागपूरचे प्रा. डॉ. कृष्णा साकुळकर, डॉ. संजय येल्लुरे, चंद्रपूरच्या प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर व नेरीचे प्रा. राम राऊत हे वक्ते असतील. संचालन प्रा. प्रफुल्ल बन्सोड करतील. दु. १२.१५ वाजता दुसरा परिसंवाद ‘राष्टÑसंतांचे ग्रामचिंतन आणि समाजकार्य’ या विषयावर होईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.