Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २७, २०१४

मंत्रीमंडळ विस्तारात तेली समाजाला प्रतिनिधीत्व

बावनकुळे, खोपडेंच्या नावाची चर्चा



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा २९ किंवा ३० नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. या विस्तारात ५ कॅबिनेट आणि १५ राज्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ सरकारमध्ये मित्र पक्षांनाही स्थान दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे नागपूरचे कृष्णा खोपडे, कामठीचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे, यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. हे दोन्ही आमदार तेली समाजाचे  प्रतिनिधीत्व करतात हे विशेष.

भाजपाचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन, कसबा पेठचे आ़ गिरीश बापट, सिंदखेडाचे आमदार जयकुमार रावळ आणि चैनसुख संचेती यांनाही कॅबिनेटमंत्रिपद मिळणार असल्याचे समजते़

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.