जळगाव, दि. 25 :- विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज (गुरुवार दि. 25 सप्टेंबर) जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तहसिल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांच्याकडे 20-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी सौ.मंदाताई खडसे, भाजपाचे तालुका अध्यक्ष निवृत्ती पाटील, नगरसेवक ॲड. संजय राणे उपस्थित होते. तत्पुर्वी श्री.खडसे यांनी मुक्ताई मंदिरात जाऊन आदिशक्ती मुक्ताईमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री.खडसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा ताफा तहसिल कार्यालयाकडे निघाला. यावेळी खा.ए.टी.नाना पाटील, खा.रक्षाताई खडसे, मलकापूरचे आ.चैनसुख संचेती, आ.गुरुमुख जगवाणी, माजी खासदार गुणवंतराव सरोदे व हरिभाऊ जावळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यकर्त्यांच्या ताफ्याचे रुपांतर मोठया जनसमुदायात झाले व नाथाभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत लाखोंच्या जनसमुदायाने नाथाभाऊंना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, सप्टेंबर २५, २०१४
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments

