चंद्रपूर | ||
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील सहाव्या संचात कोल कन्व्हेअर बेल्टला आग लागली. या आगीने सुमारे ६ लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीमुळे औष्ण्कि केंद्रातील संच क्रमांक ५ व ६ मधील उत्पादन ठप्प झाले आहे. चंद्रपूर वीज केंद्रात आज गुरुवारी दुपारी २ वाजता सहाव्या संचातील बंकरपर्यंत वाहून नेणार्या कोल कन्व्हेअर बेल्टला अचानक आग लागली. मात्र, वीज केंद्रातील फायरिंग लाईननेच ही आग आटोक्यात आणण्यात आली. अध्र्या तासात पूर्णपणे नियंत्रणात आलेल्या या आगीत १00 मीटरचा बेल्ट पूर्णपणे जळून खाक झाला. अभियंते, तज्ज्ञांच्या तत्परतेने मात्र मोठी हानी टळली. ही आग अती उष्णतेमुळे लागल्याचा कयास बांधला जात आहे. जळलेला कन्व्हेअर बेल्टची दुरुस्ती येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. या आगीने सुमारे ६ लाखांची हानी झाली असून, वीज निर्मितीत घट झाली आहे. आगीमुळे सर्वत्र धूर दिसून येत होता. दोन दिवसांपूर्वी ५00 मेगावॅट क्षमतेचे युनिट नंबर ५ सुरू झाले होते. जवळपास वीस दिवसापूर्वी युनिट नंबर ३ च्या टरबाईनमध्ये आग लागल्याने हे युनिट बंद ठेवण्यात आले.चालू आठवड्यात सर्व युनिट सुरळीत सुरू होत असतानाच आज पुन्हा आग लागल्याने दोन संच बंद पडून उत्पादनात घट झाली आहे. ल्ल |
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शुक्रवार, मे ३०, २०१४
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments

