Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे ०३, २०१४

हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू

चंद्रपूर-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गणेश या दीड वर्षाच्या हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला.



२०१३ मध्ये गणेश जयंती आणि व्हॅलेन्टाईनच्या डेच्या मुहूर्तावर या पिलाचा जन्म झाला होता. म्हणून इथल्या कर्मचाऱ्यांनी लाडानं या छोट्या हत्तीचं ‘गणेश’ असं नाव ठेवलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती. त्याच्यावर स्थानिक पशु वैद्यक अधिकारी उपचार करीत होते. उष्माघाताने ‘गणेश’चा मृत्यू झाल्याचा अंदाज पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी वर्तवलाय.
मात्र, अखेर आज त्याचा मृत्यू झाला. सुशीला या हत्तीपासून गणेशचा जन्म झाला होता. हत्तीणीसोबत लडिवाळ खेळणारं हे पिल्लू वाघांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ताडोबाच्या आनंदाचा एक भाग होता. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.