Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १९, २०१४

गारपीटग्रस्तांना 71.41 कोटींचे वाटप

 शेतकऱ्यांनी बँक खात्याची माहिती द्यावी : आयुक्ताचे आवाहन



नागपूर : यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नागपूर विभागातील 2 लाख 5 हजार 471 शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच फळबागाचे नुकसान झाले होते. या अपादग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज निधी अंतर्गत 25 मार्च रोजी 80 कोटी रुपये व 5 एप्रिल रोजी 20 कोटी असे 100 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून 81 हजार 640 शेतकऱ्यांना 71.41 कोटी रुपयांचा निधी 19 एप्रिल पर्यंत वाटप करण्यात आला. बाधीत सर्व शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यापर्यंत 100 टक्के वाटप करण्याचा निर्धार विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी केला असून अपादग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांना देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अपादग्रस्त शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना गारपीट व अवेळी आलेल्या पावसामुळे मदतीचे वाटप करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असली तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन अहवाल देण्याचे शासनाने कळविले होते. या संदर्भात विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून नुकसानीची माहिती घेऊन शासनाकडून मिळालेल्या मदत निधीचे वाटप त्वरीत करण्याच्या सूचना केल्या होत्या. या संदर्भात जिल्ह्याचे पालकसचिव यांनीही 3 ते 5 एप्रिल दरम्यान जिल्ह्यांना भेटी देऊन नुकसानीची माहिती व निधी वाटपासंदर्भात आढावा घेऊन आयुक्तांना आवश्यक सूचना केल्या होत्या.

मदतीची रक्कम प्रत्यक्ष अपादग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची असल्याने अपादग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती गावचे तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तालुकाच्या तहसीलदारांना उपलब्ध करुन देण्याचे आवाहन श्री.अनूपकुमार यांनी केले आहे. याशिवाय संयुक्त खातेदार असलेल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी संयुक्त खातेदारांपैकी एका खातेदाराच्या बँक खात्याची माहिती देऊन सर्व खातेदाराचे ना हरकत प्रमाणपत्र तलाठ्याकडे देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी बँक खात्याची माहिती उपलब्ध करुन दिल्यास 100 टक्के निधीचे वाटप आठवड्याभरात करण्यात येईल, असे आयुक्तांनी कळविले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.