Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०२, २०१४

सिटीसपीएस मध्ये दुर्गापूर पोलिसांची धाड

तिघांना अटक : पाच टन लोखंडी सळाख जप्त 
कुटी प्रकरणाची पुनर्रावृत्ती 
चंद्रपूर :पाईप चोरी प्रकरणात सबंध राज्य डोक्यावर घेणाèया बहुचर्चीत सिटीपीएस येथील सि.एच.पी. (टी.पी.) परिसरात पुन्हा एकदा कुटी प्रकरणाची पुनर्रावृत्ती झाली असल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली असल्याने येथील काही कंत्राटदारांचे धाबे दणाणले असुन सावरासावर सुरु झालेली आहे. मेसर्स मगद कन्ट्रक्शन कंपनीचे ५ टन लोखंडी सळाख टी.पी. परिसरात ठेवून होते. मेसर्स तिरुपती कंन्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजर यांनी आपल्या चोरट्या टोळीच्या सहकार्यांसह ते चोरुन मेसर्स तिरुपती कन्ट्रक्शन कंपनीच्या आवारात गुप्त ठिकाणी दडवून ठेवले असल्याची गोपनिय माहिती दुर्गापूर पोलिस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार संपत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने आज दि. २ मार्च रोजी दुपारी १.३० वाजताचे सुमारास धाड घालुन एकुण २ लाख किमतीचे लोखंडी सळाख जप्त केले. गुन्ह्यातील तिन आरोपींना ताब्यात घेवून त्यांना पोलिसीखाक्या दाखविताच या प्रकरणात वापरलेले वाहनं ईस्काट्र्स हॉयड्रा-१४ व मालवाहक ट्रेलरची माहिती त्यांनी दिली. त्या वाहनांचा शोध पोलिस घेत असून अल्पावधीतच ते सुद्धा ताब्यात घेण्याची शक्यता आहे. आरोपीमध्ये चंदु पवार (३२) रा. वार्ड क्र. ३ दुर्गापूर, राजेश बोनगुलवार (३८) रा. चंद्रपूर व संजय शेजूळ (३५) रा. चंद्रपूर हे सुत्रधार आहेत. मात्र या नाट्यातील मुख्य खलनायकाचा शोध अजूनही पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांच्या धाड सत्रामध्ये अडकलेल्या आरोपींकडून सिटीपीएस मधील अनेक चोरी प्रकरण उजागर होणार असल्याची शक्यता बळकावल्यामुळे येथील काही कंत्राटदार भुमिगत झाल्याचे वृत्त आहे. मेसर्स तिरुपती कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर आरोपी राजेश बोनगुलवार व संजय शेजूळ यांनी संगनमत करुन आरोपी चंदु पवार याला १ लाख ५  हजार रुपये नगदी देवून सदर प्रकरण घडवून आणला. मेसर्स तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनीचे मुख्य कंत्राटदाराचे नाव संजय चौरे असल्याचे समजते. ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक घनश्याम कावडे, पोलिस नायक मिलींद चव्हाण, पो.हवा. सुनिल कुनकटवार, बंडू मोरे, रवि मानकर, आनंदराव घिवे, जमिर पठाण, आनंद खरात, सुधीर मत्ते यांनी या धाड सत्रात योग्य कामगिरी बजावली आहे. सबंधीत आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पिसीआर न्यायालयातून मिळवून घेण्याकरीता दुर्गापूर पोलिस प्रयत्नशील आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.