Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १५, २०१४

बुलडाण्यात अपघात, ३ सरपंच ठार

 बुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात धामणगाव तालुक्यातील तीन सरपंचांसह चार जण जागीच ठार झाले आहेत. स्कॉर्पिओ गाडी झाडावर आदळून हा अपघात झाला. त्यात आणखी चार जण गंभीर जखमीही झालेत.

जळगाव इथं होणा-या सरपंच महापरिषदेत सहभागी होण्यासाठी धामणगाव रेल्वे तालुक्यातील सहा सरपंच आणि एका सरपंच महिलेचे पती स्कॉर्पिओ गाडीनं निघाले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीच्या एमआयडीसीजवळून जात असताना, त्यांची कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. ही धडक एवढी भयंकर होती की, त्यात चार जण जागीच ठार झाले. त्यापैकी तिघे सरपंच आहेत, तर सरपंच महिलेच्या पतीचाही मृत्यू झालाय. 

जुना धामणगावचे सरपंच प्रवीण देविदास गुल्हाने (४२), ढाकूळगावचे सरपंच मंगेश वामन म्हात्रे (३९), वाटोलाचे सरपंच नरेंद्र बहुरूपी (४०) आणि अरविंद ताळे (४५) अशी मृतांची नावं आहेत. जखमींमध्ये अनिता अरविंद ताळे, अतुल कुणबे, योगिता कोकाटे आणि ड्रायव्हर प्रवीण भालवी यांचा समावेश आहे. त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघाताच्या बातमीनं चांदूर रेल्वे तालुक्यात शोककळा पसरली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.