Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १६, २०१४

564 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : एप्रिल ते जून, 2014 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या 3 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक तसेच अन्य नगरपरिषदांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा, उल्हासनगर, सोलापूर, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा तसेच जामनेर, अकोले, अक्कलकुवा, अहमदपूर आणि पोंभुर्णा या पंचायत समित्यांमधील रिक्त असलेल्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. एप्रिल ते जून, 2014 या कालावधीत राज्यातील 22 जिल्ह्यातील एकूण 564 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.

या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मंगळवार दि. 4 मार्च ते शनिवार दि. 8 मार्च 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून सोमवार, दि. 10 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक बुधवार दि. 12 मार्च 2014 हा असेल.

नगरपरिषद निवडणुकांसाठी शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी ते शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून शनिवार, दि. 1 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपिल नसेल तेथे सोमवार दि. 10 मार्च 2014 व अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल, त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी असेल.

उल्हासनगर, सोलापूर व नवी मुंबई या महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका प्रभागातील रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी व ठाणे महानगरपालिकेच्या 4 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दि. 25 फेब्रुवारी ते मंगळवार दि. 4 मार्च 2014 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. बुधवार, दि. 5 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक शुक्रवार दि. 7 मार्च 2014 हा असेल.

जामनेर (जि. जळगाव), अकोले (जि.अहमदनगर), अक्कलकुवा (जि.नंदूरबार), अहमदपूर (जि.लातूर) आणि पोंभुर्णा (जि.चंद्रपूर) या पंचायत समित्यांमधील प्रत्येकी एका निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवार दि. 3 मार्च ते शुक्रवार दि. 7 मार्च 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे देण्यात व स्वीकारण्यात येणार असून शनिवार, दि. 8 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपिल नसेल तेथे गुरुवार दि. 13 मार्च 2014 तर अपील आहे तेथे मंगळवार दि. 18 मार्च, 2014 हा असेल.

सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका होणाऱ्या वरील सर्व ठिकाणी रविवार दि. 23 मार्च, 2014 रोजी मतदान घेण्यात येणार असून सोमवार दि.24 मार्च, 2014 रोजी मतमोजणी होईल. यासर्व निवडणुकांच्या अनुषंगाने सार्वत्रिक निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण क्षेत्रात तर पोटनिवडणुका असलेल्या ठिकाणी संबंधित प्रभागामध्ये आज रात्रौ 12 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व ती निवडणुकांचा निकाल जाहिर होण्याच्या दिनांकापर्यंत अस्तित्वात राहील असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.