धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने अधिवेशनादरम्यान काढलेल्या मोर्चात चंद्रपूर जिल्हयातील हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करावे, चराई क्षेत्र उपलब्ध करून पासेस द्यावे व इतर मागण्यासाठी 19 डिसेंबरला मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा करीता जिल्हयातील जबाबदारी डाॅ. तुषार मर्लावार व संजय कन्नावार यांचेकडे होती. यांनी मोर्चा यशस्वी करण्याकरीता गावागावातुन मोटार सायकल रॅली काढुन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. परीणामी सावली, मूल, सिंदेवाही, नागभीड, गोंडपिपरी,चंद्रपूर तालुक्यातुन 5 हजाराचे वर समाजबांधव मोर्चा सहभागी झाले. मोर्चात सहभागी झाल्यामुळे डाॅ.तुषार मर्लावार व संजय कन्नावार यांनी बांधवांचे आभार मानले आहे. |
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, डिसेंबर २२, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments