Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर १४, २०१३

निकृश्ट कामामुळे ट्रक पलटला

सावली (तालुका प्रतिनिधी) - सावली-गडचिरोली महामार्गावर मागील 2 वर्शापासुन सुरू असलेले काम निश्कृश्ट व कासवगतीने सुरू असल्यामुळे अनेकदा अपघाताची घटना घडत असतांनाच काल दि. 11 आॅक्टोंबर रोजी रात्रो 10 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर वरून राजनांदगावकडे जाणारा ट्रक किसाननगर जवळ रस्ता खोदकामामुळे पलटला. सदर रस्त्याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाÚयाचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अपघाताची मालिका सुरूच आहे. 
चंद्रपूर-गडचिरोली या राज्य महामार्ग क्रं. 7 या रस्त्याच्या कामासाठी केंद्रषासने केंद्रीय मार्ग निधी प्रकल्पाअंतर्गत 13 किमी रस्त्याच्या सुधारणेसाठी सुमारे 8 कोटी रूपयाचे निधी मंजुर करून सुरूवात करण्यात आलेले आहे. मागील 2 वर्शापासुन सदर काम चंद्रपूर येथील मे. लक्ष्मी कंट्रक्षन कंपनीने सुरू केलेले आहे. परंतु कामाला पाहिजे ती गती अजुनही आलेली नाही. यामुळे याठिकाणी अनेकदा अपघाताचे प्रमाण घडत आहे. सदर काम मूल येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कं्र. 2 यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. परंतु सदर विभागाचे अधिकारी याकामाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर रस्त्याच्या कामाचा निकृश्ठपणा यावेळी आलेल्या पावसाने उघडकीस आणला आहे.
चकपिरंजी ते हिरापूर पर्यंत सुरू झालेल्या कामावर अंदापत्रकानुसार 40 एमएम गिट्टी टाकणे गरजेचे
असतांनाही माती मिश्रीत छोटी-छोटी गिट्टी टाकुन काम करण्यात आले. त्यानंतर हिरापूर ते किसाननगर पर्यंत रस्त्याचे काम करतांना खोदकाम केलेली माती त्याच ठिकाणी टाकण्यात आली. व वरवर मुरूम पसरवुन पुर्ण मुरूच टाकल्याचे भासविल्या जात आहे. त्याचप्रमाणे किसाननगर जवळ रस्ता खोदुन वर्शेभर काम सुरू न केल्याने अनेकदा अपघात झाले. आणि त्याच खोदलेल्या ठिकाणी मातीने बुजविले. मात्र काम पुर्ण न झाल्याने अजुनही अपघाताची मालीका सुरूच आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.