Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर १४, २०१३

मुलींची हॅण्डबॉल स्पर्धेला प्रारंभ

चंद्रपूर जिल्हा अँम्युचर हॅन्डबॉल संघटनेच्या वतीने १४ सप्टेंबरपासून स्व. दादासाहेब कन्नमवार जिल्हा क्रीडा संकुलावर ३0 वी राज्यस्तरीय सबज्युनिअर मुलींची हॅण्डबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. या राज्यस्तरी स्पर्धेतून स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेत राज्यातून २७ संघ सहभागी होणार असून, जवळपास साडेपाचशे खेळाडूंची उपस्थिती राहील. निवडण्यात आलेला संघ चंद्रपुरातून २४ ते २९ सप्टेंबरला करूर (तामिळनाडू) मध्ये होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना होईल. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.