चंद्रपूर-पाटण या माओवादग्रस्त भागात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने गोळी झाडून आत्महत्या केली. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
विशाल बबन शेट्टे (वय ३०) हे मरण पावलेल्या जवानाचे नाव आहे. ते एसआरपीएफच्या दौंड येथील कॅम्पमध्ये कार्यरत होते. सुमारे सहा महिन्यांपासून शेट्टे माओवादग्रस्त भागात ड्यूटीवर होते. काही दिवसांपूर्वी ते रजेवर गेले होते. रजेवरून परतल्यानंतर रविवारी कंपनी कमांडर जवानांना सूचना देत होते. त्यावेळी गोळी झाडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यानंतर शेट्टे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडून असल्याचे जवानांना दिसले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह सातारा येथे त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आला आहे.