जिल्हाधिकारी यांनी केली चंद्रपूर शहरातील पुरग्रस्त भागाची पाहणी
चंद्रपूर दि.17 - इरई धरणात पाणी साठा वाढल्यामुळे चंद्रपूर शहरातील काही भागात पाणी सिरले असून यामुळे बाधित झालेल्या कुटूंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले असून आज जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करुन नागरीकांशी चर्चा केली. जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त प्रकाश बोखड व निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार यावेळी सोबत होते.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेवून जिल्हाधिकारी डहाळकर यांनी धरणातील साठयाचा आढावा घेतला. काल इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले होते. आज 1 वाजता सातही दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली. धरणातील साठयाचा आढावा दिवसातून दोनवेळा घेण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी दाताळा, रहेमत नगर, पठाणपूरा गेट व विठ्ठल मंदिर वार्ड भागास भेट दिली. प्रशासनाने रहेमत नगर मधील 37 कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविले. त्याचप्रमाणे राजनगर येथील 150 नागरीकांना आरवड येथील शाळेत हलविण्यात आले. पुरग्रस्त भागाची पाहणी करतांना जिल्हाधिका-यांनी नागरीकांशी चर्चा करुन प्रशासन सर्व त्या उपाय योजना करत असल्याचे सांगितले. नागरीकांनी या कामी प्रशासनास सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.