चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली, ताडोबा व कोळसा या तिन्ही परिक्षेत्रातील १५२ पाणस्थळावर २५ व २६ मे रोजी प्राणिगणना करण्यात आली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि १५९ वन्यप्रेमी या गणनेत सहभागी झाले होते. बहुतेक पाणस्थळावर वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, चांदी अस्वल, सांबर, भेकर, चितळ, मोर, रानकुत्रे, सायाळ इत्यादी प्राणी आढळून आले.
प्रगणनेत पाणवठ्यावर येणा-या वन्यप्राण्यांची मोजदाद करण्यात आली. पाणवठ्याची स्थितीही जाणून घेण्यात आली. मोजणीमध्ये सहभागी होण्याकरिता पुणे, मुंबई, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा येथून अनेक अशासकीय संस्थांनी व व्यक्तींनी आपले अर्ज पाठविले होते. अर्जाची छाननी करून अनुभवी व्यक्ती व संस्थामधील १५९ लोकांना पाणस्थळ मोजणीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली. यात १२ संस्थांचे ८५ व्यक्ती व वैयक्तिकरीत्या सहभागी झालेले ३९ व्यक्तींचा समावेश होता. मोजणीत चंद्रपूर येथील ८४, नागपूर २४, पुणे ६, मुंबई ६ व इतर ४ व्यक्ती सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा तसेच पत्रकारांचासुद्धा सहभाग होता. निवडलेल्या व्यक्तींना व्यवस्थापनातङ्र्के प्रकल्पात प्रवेश देण्याकरिता त्यांची छायाचित्र असलेले प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. प्रत्येक पाणस्थळाजवळील मचाणीवर एक अशासकीय व्यक्ती व एक स्थानिक वनकर्मचारी प्रगणनेकरीता देण्यात आला होता. प्रगणना सुलभरीत्या व्हावी म्हणून त्यांना वन्यप्राण्यांची छायाचित्र असलेले प्रपत्र नोंदणी करण्याकरिता देण्यात आले. प्रगणना २५ तारखेला सकाळी १० वाजता सुरू करण्यात येऊन २६ रोजी सकाळी १० वाजता पूर्ण करण्यात आली. प्रगणना पूर्ण करण्याकरिता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांनी विशेष समन्वय ठेवला. सुजय दोडल, एस.व्ही. माडभूषी, सचिन qशदे, बापू येळे, एन.डी. लेनेकर, बी.एस. पडवे, श्री. गजभिये व क्षेत्रीय कर्मचारी यांनीही सहकार्य केले.