चंद्रपूर - जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका खुनाच्या कैद्यावर दुस-या एका कैद्याने दाढी करण्याच्या धारदार वस्त-याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे. जखमी स्थितीत या कैद्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठवडाभराआधी या कारागृहातून २ कैद्यांनी प्रचंड उंच भिंत ओलांडून पळ काढला होता. या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चंद्रपूर जिल्हा कारागृहात आज सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. या कारागृहात काही कैद्यांची दाढी करण्यासाठी न्हावी बोलाविले गेले होते. दरम्यान खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या शेख अफजल शेख अजीज याची दाढी सुरु असतानाच एक अनोळखी कडी वेगाने अजीज जवळ आला व न्हाव्याकडील वस्त-याने अजीजच्या पोटावर सपासप वार केले. काही कळायच्या आतच अजिज रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला लगेच चंद्रपूर जिल्हा सामन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजीजच्या पोटावर व गळ्यावर धारदार वस्त-याचे वार असून सामान्य रुग्णालयात त्याच्यवर उपचार सुरु आहेत. हल्लाग्रस्त कैद्याने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांआधी अजीजची कारागृहातील काही पोलिस रक्षकांसोबत वादावादी झाली होती. त्याचा राग मनात ठेवून या राक्षकानीच अनोळखी कैद्यांकरावी आपल्यावर हल्ला करविला असल्याचा आरोप केला आहे.
V/O 2) आठवडाभरापूर्वी या कारागृहातून २ कैद्यांनी उचं भिंत ओलांडून पळ काढला होता. त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. याप्रकरणी ३ सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यातच हा हल्ल्याचा प्रकार घडल्याने या कारागृहाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्हे मिळून चंद्रपुरात एकाच कारागृह आहे. या कारागृहात अनेक नक्षल कैदी जेरबंद आहेत. आता सुरक्षा व्यवस्थेला एवढे मोठे खिंडार पडल्याने तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे.