Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे २६, २०१३

रोहिणी लागताच चंद्रपूरचे तापमान घटले

बळीराजाला मृगाची प्रतीक्षा
चंद्रपूरचे तापमान- ४२ अंश 

चंद्रपूर : रोहिणी नक्षत्राचा पाऊस पिकांना लाभदायक ठरणारा नसला, तरी प्रखर उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांची सुटका होईल. शेतक-यांना आता मृगाची प्रतीक्षा लागली आहे.
मृग नक्षत्र हे सहसा सात जून रोजी सुरू होते. परंतु, यावर्षी मृग प्रवेश आठ जून रोजी पहाटे ५.३६ वाजता होत आहे. वाहन हत्ती असल्यामुळे हे नक्षत्र भरपूर बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील चार वर्षांत मृगाचा पाऊस उशिरा झाल्याने शेतकèयांना मृगपेर साधलेली नव्हती. यावर्षी २० जूनपर्यंत सर्वदूर वृष्टी अपेक्षित आहे. पंचांगकत्र्यांच्या मते मागील पाच वर्षांतील पाऊसकाळ पाहता खंडित वृष्टीचे प्रमाण अधिक राहिले आहे. यावर्षी पाऊस सर्वत्र दर्शविला असल्याने जुलै व ऑगस्ट महिन्यापर्यंत सरासरीच्या ५५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
२५ मे रोजी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी रोहिणी नक्षत्राचा प्रवेश झाला. या नक्षत्राच्या शेवटच्या चरणात वादळी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. मृग, आद्र्रा, पुनर्वसू, पुष्य, एषा, मेघा, पूर्वा व स्वाती हे नक्षत्र निश्चितपणे व भरपूर बरसणार आहेत. वर्षाकाळातील ११ नक्षत्रांपैकी ९ नक्षत्रे पावसाची असतात. सहसा पाच नक्षत्रे जरी बरसली, तरी शेती चांगली होऊ शकते.
२५ मेपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ होत असून, याचे वाहन ङ्कमोरङ्क आहे. हे नक्षत्र सहा जूनपर्यंत राहणार आहे. सात जून रोजी मृग नक्षत्रास प्रारंभ होणार आहे. शेतकèयांनी आपल्या शेतीची मशागत पूर्ण केली आहे. यावर्षी पीक चांगले यावे म्हणून काही शेतकèयांनी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला बियाणे खरेदी केले. उन्हाळ्याचे दिवस नागरिकांनी प्रखर उन्हात कसेबसे काढले असून, पाऊस पडेपर्यंत नागरिकांना अजून उन्हाचा सामना करावा लागणार आहे. प्रखर उन्हामुळे जमीन तापली असून, रोहिणी नक्षत्राचा पाऊस जमिनीतच मुरला जाणार आहे. पावसाळा जवळ आला असला, तरी उन्हाचा पारा कमी होण्याचे नाव घेत नाही. आता रोहिणी नक्षत्राचा ङ्कमोरङ्क पाऊस आणतो की, आल्यापावली ङ्कथुई थुईङ्क करत वनात जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सर्वसाधारणपणे २० मे रोजी मॉन्सून अंदमानात पोहोचतो. मॉन्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित असते. यावर्षी मात्र तीन जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्याचबरोबर अंदमानातील नैऋत्य मोसमी वारे स्थिर झाले असले, तरी त्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण बंगालच्या उपसागरात तयार झाले नसल्याने आणि पुढील तीन ते चार दिवसांमध्ये हे वातावरण तयार होण्याची शक्यता नसल्याने बेमोसमी पावसाचीही शक्यता नसल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा कमी कमी होत असताना आणि पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र बनत असताना साèयांचेच पावसाकडे डोळे लागले आहेत.
रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाल्याने वातावरणात थंडावा येऊ लागला आहे. उष्णतेची दाहकता कमी होत असून, पारा घसरू लागला आहे. ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात होत आहे. खते, बी-बियाणे व शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकèयांची लगबग दिसून येत आहे. घरांचे छत व धाबे, इमारतींचे टेरेस आदींच्या स्वच्छता कार्यास सुरुवात झालेली आहे.

अंदाज वर्तविण्याची जुनी परंपरा
नैऋत्य मॉन्सून वाèयाच्या आगमनासोबतच रोहिणी नक्षत्राची सुरुवात होते. या काळात कावळा, पावशा (तितर) व चातक या तीन पक्ष्यांच्या कार्यात मोठे बदल होत असतात. या बदलांना संकेत मानून अंदाज वर्तविण्याची जुनी परंपरा आहे. कावळ्याचे घर झाडाच्या शेंड्यावर असेल, तर पाऊस कमी होण्याचे संकेत मानले जाते. झाडाच्या मध्यभागी असल्यास पावसाचे प्रमाण साधारण मानले जाते.

शेती परवडेना
शेती मशागत महागली असून, लागवड खर्चातही वाढ झाली. वाढता उत्पादनखर्च, हवामान बदल यामुळे कमी होणारे उत्पन्न आणि पीक हाती आल्यावर घसरत जाणारे बाजारभाव यामुळे शेतीव्यवसाय परवडेनासा झाला आहे. इंधनाचे वाढते दर, ट्रॅक्टरच्या व त्याच्या साहित्याच्या वाढत्या किमती यामुळे ट्रॅक्टरची नांगरणी, वखरणी, पेरणी करण्याचे दरही वाढले आहेत. मॉन्सून सुरू होण्यासाठी १५-२० दिवसांचा अवधी असून, शेतीच्या मशागतीने वेग घेतला आहे. परंपरागत शेती करताना बळीराजाने यांत्रिकीकरणाची जोडही दिली आहे. आता बैलजोडी व लोखंडी नांगर कालबाह्य झाले असून, बरेच शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करीत आहेत.
----------------
मे महिन्यातील तापमान२६-४२   २५- ४५    २४-४६२३-४७.३२२- ४८.२२१- ४८.२२०- ४७.९१९- ४७.९१८ - ४५.६१७ - ४५.५१६- ४२.६

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.