Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २८, २०१३

कृष्णनगरात युवकाची निर्घृण हत्या

चंद्रपूर  दि.२८ (प्रतिनिधी):
क्षुल्लक वादातून दोन मित्रांमध्ये झालेल्या हाणामारीत एका मित्राने दुसèया मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णनगर येथे मंगळवार, २८ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. कृष्णा चित्त मंडल (२३, रा. कृष्णनगर) असे मृताचे नाव आहे. तर, आकाश वासू सरकार (२६) असे आरोपीचे नाव आहे.
आकाश सरकार आणि मृत कृष्णा मंडल हे दोघे कृष्णनगरातील असून, दोघांमध्ये मित्रत्वाचे संबंध होते. कृष्णा मंडल हा फायनान्सवर गाडी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतक कृष्णा आणि त्याचा मित्र प्रवण चक्रवर्ती हे दोघे वॉर्डातीलच एका दुकानात थंडपेय पेत होते. दरम्यान, आरोपी आकाश सरकार तेथे आला. यावेळी दोघात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर काही मित्रांच्या मध्यस्थीनंतर वाद क्षमला. मात्र, आरोपी आकाशच्या डोक्यात मृतक कृष्णाच्या विरोधातील राग धगधगत होता.
बुधवारी, सकाळच्या सुमारास आकाश सरकार कृष्ण मंडलला मारण्याच्या इराद्यानेच त्याच्या घरी आला. त्यावेळी पुन्हा दोघात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात आरोपी आकाशने कृष्णावर लाकडी फडीने जोरदार प्रहार केला. यात कृष्णा गंभीररित्या जखमी झाले. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेची तक्रार मृतकाचा मावस भाऊ किशोर बारई याने रामनगर पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरुन रामनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मुटकुळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व आरोपीस अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.