मुंबई, दि. ३०- उच्चशिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल बुधवारी सकाळी जाहीर झाला. यंदा राज्यातून ७२.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. तर कोकण विभागाने गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही चमकदार कामगिरी करत अन्य विभागांना मागे टाकले.
बुधवारी सकाळी ११ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षी विज्ञान, वाणीज्य आणि कला याविभागातील १२ लाख ७६ हजार ३५६ विद्यार्थी १२ वीच्या परिक्षेत बसले होते. यातील ९ लाख २५ हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी कोकण विभागाने लातूर,मुंबई, पुणे याविभागांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले होते. यंदाही कोकण विभागाने पहिला क्रमांक अबाधित ठेवला आहे. या विभागाचा निकाल ८२.६२ टक्के लागला असून त्याखालोखाल कोल्हापूर (७८.६१ टक्के) आणि औरंगाबद (७७.८८ टक्के) या विभागांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (६५.०६) लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारल्याचे दिसते. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७८.८२ असून मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६७.८५ आहे.