Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १७, २०१३

चंद्रपूर मनपाच्या पाणी पुरवठा कार्यालयाची केली नासधूस-तोडफोड


राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांच्या उद्दामपणाचे किस्से चर्चिले जात असताना चंद्रपूर शहरात मात्र एक अनोखी घटना उजेडात आली आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शहरातील पाणी पुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. रात्री उशिरा झालेल्या या घटनेत ३ राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश होता. यातील विशेष बाब म्हणजे तोडफोड करून झाल्यावर या निर्ढावलेल्या कार्यकर्त्यांनी इथे उपस्थित कंपनीच्या कर्मचा-याला चक्क visiting card दिले. 
चंद्रपूर शहरात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी मनपाने  उज्ज्वल construction कंपनी या खाजगी कंपनीकडे दिली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. शहराच्या काही भागात पाणी पुरवठ्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी येत आहेत. आता त्यावर काही उपाय योजना होत आहेत कि नाही हा प्रश्नच असला तरी त्याची शक्यता कमीच आहे. म्हणूनच कि काय  काही राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा जलभवन परिसरात असलेल्या या कंपनीच्या कार्यालयात पोचून कार्यालयाची प्रचंड नासधूस केली. या वेळेस कार्यालयात केवळ एकच कर्मचारी उपस्थित होता. मनसोक्त धुडगूस घालुन शिवीगाळ केल्यावर त्यांनी उपस्थित कर्मचा-याला चक्क आपले visiting card दिले. त्यावर संदीप यासलवार ,नेता ,शहर सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस लिहिले आहे. कार्ड वर शरद पवार व अजितदादा यांचे फोटो आहेत. काही वेळातच हे राष्ट्रवादी कार्यकर्ते घटना स्थळावरून पसार झाले. तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धुडगूस मोहीम फत्ते झाली होती.
 राज्यातल्या शहरोशहरी -नाक्या नाक्यावर नागरिकांशी  अनेकदा असामाजिक तत्वांची गाठभेट होते. त्यांचे कारनामेही चर्चिले जातात. मात्र दंडेली, धुडगूस , तोडफोड , संपत्तीचे नुकसान तेही visiting card सह. काय चाललय हे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कार्यकर्ते कुणाचा आदर्श ठेवत आहे हे ही तपासण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या सत्ताधारी नेत्यांनी  सांगितलेली कामेही प्रशासन ऐकत नाही कि कार्यकर्ते उन्मत्त झालेत हा प्रश्नच आहे. राष्ट्रवादीच्या या visiting card वाल्या गुंडांवर पोलिसांनी गुन्हे तर नोंदविले आहेत. मात्र आबांची पोलिस राष्ट्रवादीचा व्यापक विचार ठेवते कि नेत्यांना वठणीवर आणते याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यात दुष्काळाचे प्रश्न आ वासून पडले असताना स्वतःहून नव्या समस्या निर्माण करणारे हे कार्यकर्ते कुठला आत्मक्लेश स्वीकारणार हे  बघावे लागेल. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.