चंद्रपूर : सोन्याच्या भावात मंगळवारी (ता. १६) मोठी घसरण झाल्यानंतर खरेदीसाठी ग्राहकांनी सराङ्कात मोठी गर्दी केली होती. दुपारपर्यंत सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव २६ हजार ५००, तर दुपारनंतर २६ हजार ८०० रुपये एवढा होता. सोन्याच्या भावामध्ये गेल्या पंधरा महिन्यांत झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. लग्नसराईचे दिवस असतानाच सोन्याने ङ्कभाव खाणेङ्क सोडल्याने लग्नघरांतील मंडळीच नव्हे तर, इतरही घरांमध्ये सोनेखरेदीसाठी ‘लगीनघाईङ्क सुरू झाली आहे. त्याचवेळी सोन्यात गुंतवणूक करणारे चिंतेत आहेत. मात्र जाणकार २४ हजारापर्यंत घसरण झाल्यानंतर सोनं स्थिरावण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
युरोपातील एका बड्या वित्तसंस्थेने त्यांच्याकडील सोने बाजारात विक्रीसाठी काढल्याने जगभरातील सोन्याचे भाव कोसळले आहेत. दहा ग्रॅम सोन्याच्या दरात सोमवारी एक हजार २०५ रुपयांची घट झाली असून, भाव २७ हजार २०० रुपयांवर होता. हाच दर २९ डिसेंबर २०११ रोजी होता. गेल्या दीड वर्षातील ही सर्वांत मोठी घसरण आहे. ऐन लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे भाव उतरत असल्याने वधूपित्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत घसरण कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे सराङ्का व्यापारी सुभाष qशदे यांनी सांगितले. सोन्यासोबत चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, ५० हजार रुपये दर होता. एक एप्रिल रोजी दहा ग्रॅम सोन्याचे दर ३० हजार ३० रुपये होते, तर एक किलो चांदी ५३ हजार ९०० रुपयांवर होती. गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या दरात दोन हजार ८१०, तर चांदीच्या दरात पाच हजार ४०० रुपयांची घसरण झाली आहे.