Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल ०५, २०१३

राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलन


चंद्रपूर- स्त्री षिक्षणापासून सुरु झालेला स्त्रीचा स्वंयभू प्रवास लक्षात घेता 21 व्या शतकाकडे वाटचाल करणारी स्त्री आज स्त्रीशक्तीच्या रुपात वावरतांना दिसते. अनेक क्षेत्र तिने काबीज केले आहे. तिला हे यश मात्र सहजासहजी प्राप्त झाले नाहीतर जिद्दचिकाटीसंघर्शकश्टप्रयत्न यांची सतत सोबत करीत तिला हे यषोषिखर गाठता आले आहे. तिच्या या प्रवासाचा नागर-ग्रामीण भागातील अलक्षित स्त्रियांना जवळून परिचय घडावा तसेच स्त्री जाणिवंाच्या विविध पैलूवर सशक्त चर्चा करता यावी याकरीता चंद्रपूरातील सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे शनिवार  दि. 20 व रविवार 21 एप्रिल2013 ला राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन प्रसिद्ध लेखिका व कथाकार डॉ. प्रतिमा इंगोले यांचे अध्यक्षतेत सरदार पटेल महाविद्यालयात करण्यात आलेले आहे. महाराश्ट्रातील सामाजिक,साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत स्त्री-पुरुशांच्या विचारांची देवाण-घेवाण या संमेलनामागची प्रेरणा आहे. चंद्रपूर शहरात स्त्री साहित्य संमेलन प्रथमच होत असून सदर संमेलनातील कार्यक्रमात विविध विशयावर तीन चर्चासत्र तसेच दोन कविसंमेलन / कथाकथन / सांस्कृतिक कार्यक्रम / अभिरुप न्यायालयाचा समावेश असून चंद्रपूरकर साहित्यरसिकांसाठी व स्त्री साहित्य अभ्यासकांसाठी ही उत्तम संधी असून जास्तीत जास्त रसिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष किषोर जोरगेवार व सूर्यांश संस्थेचे अध्यक्ष इरफान षेख यांनी केले आहे. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री षांताराम पोटदुुखे या संमेलनाचे संवर्धक असून 20 एप्रिलला पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून याप्रसंगी षांताराम पोटदुखे व चंद्रपूर च्या प्रथम महापौर संगीता अमृतकर यांची विषेश उपस्थिती राहील तसेच विदर्भ साहित्य संघाचे कायकारीणी सदस्य डॉ.जाकीर षेख यांचीही उपस्थिती यावेळी राहील. दुपारी 12 वाजता दुस-या सत्रात डॉ. शदरचंद्र सालफळे यांचे अध्यक्षतेत कथाकथन  होणार असून वर्शा किडे-कुलकर्णी (नागपूर) सौ.संध्या दानव,संगीता पिज्दुरकरनीता कोंतमवारप्रा. धनराज खानोरकर (ब्रम्हपुरी) मिलिंद बोरकर (चंद्रपूर) आपल्या कथा सादर करतील. तिस-या सत्रात दुपारी 2.30 वाजता स्त्री मुक्तीचा लढा: एक आढावा या विशयावर चर्चासत्र होणार असून या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.इंदुमती लहाने (बुलढाणा) असतील तसेच नरेंद्र लांजेवार (बुलढाणा) साधना कदम (हिंगोली) डॉ. षोभा रोकडे (अमरावती) डॉ.इसादास भडके (चंद्रपूर) डॉ.राजन जयस्वाल (नागभीड ) डॉ.विद्याधर बन्सोड (चंद्रपूर) आपले भाश्य करतील. संध्याकाळी 4वाजता चवथ्या सत्रात प्रसिद्ध समाजसेविका व स्त्रीचळवळीच्या कार्यकर्त्या सीमा साखरे यांची अभिरुप न्यायालयात प्रकट मुलाखत आकाशवाणीच्या निवेदिका वीणा मोहरकर व अनुश्री पाठक घेणार यात षांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली हस्तक न्यायाधीश असतील. संध्याकाळी पाचव्या सत्रात संध्याकाळी 5.30ते 7 दरम्यान कथ्थक साधना केंद्राच्या वतीने सौ. भाग्यलक्ष्मी देशकर व त्यांची चमू नाच रे मोरा हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.रात्रो 8 वाजता सहावे सत्र प्रा. विमल गाडेकर यांच्या अध्यक्षतेत कविसंमेलनाचे होणार असून कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. माधवी भट करतील. या कविसंमेलनात अतिथी कवी म्हणून सोलापूरचे ज्येश्ठ कवी बदिउज्जमा बिराजदार राहतील. यात श्रीपाद प्रभाकर जोषीविश्णू सोळंकेअनुपमा मुंजेडॉ.लीना निकमषिवाजी चाळकनजीम खान,प्रषांत डोंगरदिवेगीता मेश्रामसंगीता धोटेनंदिनी देवईकरउशा बुक्कावारकल्पी जोषीकुसुम आलाम,संध्या पाळधीकररंगनाथ रायपुरेमदन पुराणिकप्रषांत मडपुवारअजय धवनेमीरा जांबकरवैषाली गेडामविद्या देठेमनिशा खोटेलेचित्रलेखा धंदरेअल्का चंद्रषेखरडॉ.प्रमिला उमरेडकर इ.कवी -कवयित्री सहभागी होतील. रविवारी 21 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सातव्या सत्रात षैलजा कारंडे (लातुर) यांच्या अध्यक्षतेत स्त्रीवादी साहित्याचे बदलते स्वरुप: एक आकलन या विशयावरील चर्चासत्र आयोजीत आहे. यात डॉ. मार्तंड कुलकर्णी (नांदेड)  डॉ. पद्मरेखा धनकर-वानखेडे (चंद्रपूर) डॉ. सुदर्षन दिवसे (कोरपना) डॉ.ष्याम मोहरकर (चंद्रपूर) प्रा. जयश्री कापसे-गावंडे (चंद्रपूर) सौ.सविता भट (चंद्रपूर) सहभागी होतील. सकाळी 11.30 वाजता आठव्या सत्रात वर्तमान कालीन स्त्री चळवळीचे वास्तव आणि अपेक्षा या विशयावर चर्चासत्र होणार या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मुलच्या विधान परिशद सदस्या षोभा फडणवीस राहतील व रजिया सुलताना (अमरावती) प्रा. मिनल येवले (नागपूर) डॉ.रेखा मेश्राम (ब्रम्हपुरी) मेघना वाहोकार (नागपूर) डॉ.पद्मा पंडे (चंद्रपूर) प्रा. मिनाक्षी वेरुळकर (अहेरी) भाश्य करतील. दुपारी 2 वाजता नवाव्या सत्रात उशाकरिण आत्राम यांच्या अध्यक्षतेत दुसरे कवी संमेलन होणार असून कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प््राा. विजया मारोतकर (नागपूर) करणार असून यवतमाळचे कवी सुरेश गांजरे अतिथी कवी राहतील. यात सुरेश रामटेकेविजय सोरतेफुलचंद वंडु खोब्रागडेभानुदास पोपटेआषा नागवंषीबी.सी. नगराळेअंकुश वाघमारेअविनाश पोैनिकरकिषोर कवठेना.गो.थुटेदिपक षीवबापुराव टो्रगेरत्नाकर चटपषंकर राठौडमारोती गव्हाणेआनंद निलगीरवारएजाज खानविनायक पवारगोविंद व्यासविनायक त्रिपत्तीवाररघू मामाअषोक चिन्नावार,आनंद निलगीरीवारषेश देऊरमल्लेरंगनाथ रायपुरेआपल्या कविता सादर करतील. संध्या. 5 वाजता दहाव्या सत्रात संमेलनाचे समारोप होणार असून यावेळी विषेश अतिथी म्हणून प्रख्यात ललित लेखक रविंद्र गुर्जर व ज्येश्ठ स्त्री साहित्य अभ्यासिका डॉ. जया द्वादषीवार यांची उपस्थिती राहील. तसेच लेखिका अरुणा सबानेभारती साबळे व अषोक पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. संमेलनात निवडक स्त्री साहित्यिक व समाजसेविकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. संमेलनात सहभागी होणा-या प्रतिनिधींची व्यवस्था आयोजन समिती करेल. सहभागी प्रतिनिधींना सन्मानपत्र प्रदान करण्यात येतील. संमेलनस्थळी चित्रकार सुदर्षन बारापात्रे यांची चित्रप्रदर्षनी व पुस्तकांचे स्टॉल राहणार आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त रसिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संमेलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.ष्याम मोहरकर उपाध्यक्ष डॉ. विद्याधर बन्सोड,प्रा.रविकांत वरारकरप््राा.जयश्री कापसे -गावंडेडॉ.पद्मरेखा धनकर-वानखेडेव आयोजन समितीतील सौ.संध्या दानवसौ नीता कोंतमवारसौ. सीमा पाटील,कु. संगीता पिज्दुरकरसौ.वर्शा चोबेश्रीमती तनुजा बोढाले व स्वागत समितीतील डॉ. नंदा अल्लुरवार - प्रमुखअषोकसिंग ठाकुरप्राचार्य अनिल मुसळेप्रा. विमल गाडेकरप्रा. विजय बदखल,रष्मी वैरागडेअष्विनी खोब्रागडे आदींनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.