Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०४, २०१३

पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन ६ एप्रिल रोजी


चंद्रपूर,   : चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्विदिवसीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन ता. ६ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता पत्रकार भवनात जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवि गीते, अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळ हुनगुंद राहणार आहेत. या कार्यशाळेत एकूण सहा विविध विषय ठेवण्यात आले असून, त्यासाठी सहा मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आले आहे. ता. सहा एप्रिल रोजी उद्घाटनानंतर मवृत्तलेखन : भाषा आणि मांडणीङ्क या विषयावर औरंगाबाद येथील डॉ. सुधीर गव्हाणे मार्गदर्शन करतील. त्यानंतर मपत्रकारिता आणि शुद्धलेखनङ्क या विषयावर नागपूर येथील दीपक रंगारी, मएसएमएसचे पत्रकारितेतील महत्त्वङ्क या विषयावर पुणे येथील qचतन गृपचे अप्पा qडगणकर यांचं मार्गदर्शन होणार आहे. दुसèया दिवशी म्हणजे ता. ७ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता मजनसंपर्क : महत्त्व आणि गरजङ्क या विषयावर मुंबई येथील प्रमोद चुंचुवार, मअर्थसंकल्पाचे विश्लेषण आणि वृत्तांकनङ्क या विषयावर आमदार देवेंद्र ङ्कडणवीस आणि मतणाव व्यवस्थापनङ्क या विषयावर डॉ. किरण देशपांडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. समारोप सात एप्रिल रोजी सांयकाळी साडेपाच होईल.
या कार्यशाळेसाठी येणाèया पत्रकारांची निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली असून, या कार्यशाळेचा लाभ पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहन श्रमिक पत्रकार संघ आणि माहिती कार्यालयाने केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.